यावेळी रुग्णांना अधिकाधिक चांगल्या सुविधा कशा देता येतील, याकडे लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही खासदार पवार यांनी संबंधिताना दिल्या.
लसीकरण मोहीम जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन पवार यांनी सदर बैठकीत केले.
बैठकीस प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शरद कातकडे, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कुप्पास्वामी आदींसह भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. नंदकिशोर शिंदे, शहराध्यक्ष तरंग गुजराथी, आनंद शिंदे, प्रमोद सस्कर, समीर समदाडीया, संतोष केंद्रे, नाना लहरे, मयूर मेघराज, प्रणव दीक्षित आदी उपस्थित होते.
दरम्यान, सावरगाव येथील कोविड लसीकरण केंद्रास खासदार डॉ. भारती पवार यांनी भेट देऊन पाहणी केली.