पिंपळगाव बसवंत : येथे आदिवासी शक्ती सेनेची आढावा बैठक झाली. सदर बैठकीत आदिवासी शक्ती सेनेच्या शाखा समस्यांचा पाढा वाचण्यात आला.अतिक्रमित जागा नियमित करण्यासाठी विषय मांडण्यात आले. पाणी, रस्ते, घरकुल, शौचालय, रेशनकार्ड, जातीचा दाखला अशा विविध प्रश्नांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली. भविष्यातील ध्येय धोरणांचा आराखडा बैठकीत तयार करण्यात आला. सदर मागण्या घेऊन आदिवासी समाजाच्या मोर्चाचे आयोजन करण्यासाठी पिंपळगाव बसवंत येथे प्रभाकर फसाळे उत्तर महाराष्ट्र प्रमुख आदिवासी शक्ती सेना यांच्या विशेष उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्ष संदीप गांगुर्डे होते. यावेळी चांदवड तालुका अध्यक्ष बळीराम वाघ, निफाड तालुका विभागप्रमुख सचिन जाधव, निफाड तालुका युवा संपर्कप्रमुख श्रावण कोटील, मुखेड अध्यक्ष परशराम सूर्यवंशी, शरद गायकवाड, नांदुर्डी विभागप्रमुख कैलास सूर्यवंशी, पिंपळगाव संपर्कप्रमुख जितू वाघ, कार्याध्यक्ष गणेश गायकवाड, तुळशीराम गुंबाडे, योगेश गांगुर्डे, शिवाजी गांगुर्डे, सुनील वाघ, रवींद्र पवार, शशिकांत गांगुर्डे, रणजित पाडे, अंकुश वाघ, चेतन डंबाळे, वसंत वाघ, चेतन चतुर, तुषार वाघ, केशव लोखंडे, रमेश खभोरे, संतोष कडाळे, शंकर गांगुर्डे, सचिन जाधव आदींसह निफाड, चांदवड येथील शाखेतील पदाधिकारी उपस्थित होते.प्रतिक्रि या........स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निफाड व चांदवड येथील आदिवासी बांधवांच्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत. लोकप्रतिनिधीकडे दाद मागूनही प्रतिसाद मिळाला नाही, परिणामी नाशिक जिल्ह्यातील प्रशासनाला आदिवासींच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे.- प्र्रभाकर फसाळे, उत्तर महाराष्टÑ प्रमुख...................आदिवासी बांधव स्वातंत्र्य काळापूर्वीपासून मोलमजुरीसाठी स्थलांतर झाले आहे. निफाड व चांदवडमधील आदिवासी बांधवांना अद्यापही जातीचा दाखला मिळत नाही, याबाबत प्रशासनाची उदासीनता दिसून येते. त्यामुळे पाणी, रस्ता घरकुल, वीज आदी मागण्यांसाठी आदिवासी शक्ती सेना व समाजबांधवांचा येत्या काही दिवसातच आक्र ोश मोर्चा नाशिक जिल्हा प्रशासनाकडे दाखल होणार आहे.- संदीप गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष
आदिवासींच्या समस्यांबाबत आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 4:18 PM
येथे आदिवासी शक्ती सेनेची आढावा बैठक झाली. सदर बैठकीत आदिवासी शक्ती सेनेच्या शाखा समस्यांचा पाढा वाचण्यात आला. अतिक्रमित जागा नियमित करण्यासाठी विषय मांडण्यात आले. पाणी, रस्ते, घरकुल, शौचालय, रेशनकार्ड, जातीचा दाखला अशा विविध प्रश्नांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली.
ठळक मुद्देस्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निफाड व चांदवड येथील आदिवासी बांधवांच्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत.