नाशिक : जनता संचारबंदीत सहभाग घेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.कोरोनाविरु द्धच्या लढ्यात सहभागी जनतेबरोबरच जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि प्रशासनातील अधिकाºयांनीदेखील घरी राहून सहभाग घेतला. दुपारी जिल्हाधिकाºयांनी घेतलेल्या आढावा बैठकीलाही मार्गदर्शन केले तेदेखील घरी बसून मोबाइलच्या टेलिग्राम अॅपवर. रविवार असल्याने सरकारी व खासगी आस्थापना आज बंद होत्या.या आॅनलाइन मोबाइल बैठकीत अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, सहायक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, डॉ. पंकज आशिया, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे (निफाड), तेजस चव्हाण (त्र्यंबकेश्वर-इगतपुरी), विजयकुमार भांगरे (बागलाण), संदीप आहेर (निफाड) आदींनी चर्चेत सहभाग घेतला. जिल्ह्णातील विविध भागांची माहिती, सद्यस्थिती छायाचित्रे, व्हिडीओद्वारे जाणून घेतली.यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले की, आजपासून जिल्ह्णाच्या सीमारेषेवरून येणाºया रस्त्यांवर वाहनांची कसून चौकशी करण्यात यावी. ही चौकशी प्रामुख्याने कोरोना संशयित व्यक्ती म्हणूनच करण्यात येईल. पथकाला पुरेशा प्रमाणात मास्क, सॅनिटायझर, शेड, पाणी, वैद्यकीय साधने, सुविधा अशी व्यवस्था करण्यात यावी. तपासणी केलेल्या वाहनांची, नागरिकांची रजिस्टरमध्ये नोंद ठेवण्यात यावी. तहसीलदार, विस्तार अधिकारी यांचे एक भरारी पथक नेमावे. आवश्यक तेनुसार रु ग्णवाहिकांची सेवा घ्यावी.अधिकाºयांनी सादर केला अॅक्शन प्लॅनजिल्ह्णातील अधिकाºयांनीही आज आपले घर सोडायचे नाही, अशा आदेशवजा सूचनाच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या होत्या. त्याची शंभर टक्के अंमलबजावणी करत आज जिल्ह्णातील सर्व महसूल अधिकाºयांनी घरातूनच काम केले. दुपारी जिल्हाधिकाºयांनी मोबाइलच्या टेलिग्राम अॅपवरील ‘जिल्हाधिकारी कार्यालय’ ग्रुपवर या अधिकाºयांची आढावा बैठक घेतली. त्यात सहभागी अधिकाºयांनी आपापल्या भागातील क्षेत्राची वस्तुस्थिती सांगत अॅक्शन प्लान सादर केला.
जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 12:05 AM
नाशिक : जनता संचारबंदीत सहभाग घेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
ठळक मुद्दे रविवार असल्याने सरकारी व खासगी आस्थापना आज बंद होत्या.