सुरगाणा : तालुक्यातील उंबरठाण येथे झालेल्या आढावा बैठकीत नागरिकांनी वीज वितरणसह सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात तक्रारी करीत समस्यांचा अक्षरश: पाऊस पाडला.बैठकीत इंद्रजित गावित यांनी घरकुलांचे पैसे अद्यापही मिळाले नाहीत अशी तक्रार केली. रमेश थोरात यांनी तालुका ग्रामीण रुग्णालयात १०८ रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध करून दिली जात नाही. बुबळी, चिराचापाडा येथे वैद्यकीय अधिकारी राहत नाहीत, यावर उपाययोजना न केल्यास आम्हाला कायदा हातात घेऊन धडा शिकवावा लागेल असा राग व्यक्त केला. गुजरात सीमेवरील मांधा गावात गुजरात राज्यातील वैद्यकीय अधिकारी येऊन माणुसकी दाखवून सेवा देतात, मात्र महाराष्ट्र सरकारकडून वैद्यकीय सेवा मिळत नाही त्यामुळे गुजरात पास महाराष्ट्र फेल असे म्हणण्याची वेळ आली आहे. या सीमावर्ती भागात १०८ नं. डायल केला तर थेट गांधीनगर येथे लागतो. कुकुडणे येथे वैद्यकीय अधिकारी आहेत, मात्र दवाखाना नेहमीच बंद असतो. उंबरठाण रुग्णालयात दोन पदे अनेक वर्षे रिक्त आहेत. वनविभागाचे पंधरा ते वीस लाखांचे बंधारे एका रात्रीत केले जातात, त्यामुळे रात्रीस खेळ चाले असे म्हणण्याची वेळ आली आहे.वीज वितरण कार्यालयाविरोधात नागरिकांनी तक्र ारी केल्या. शासनाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने आपल्या कर्तव्यातून आदिवासी बांधवांना ओळख करून द्यावी, असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी उंबरठाण येथे आयोजित विकासकामांच्या आढावा बैठकीप्रसंगी केले.यावेळी चिंतामण गावित, सभापती मनीषा महाले, उपसभापती इंद्रजित गावित, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, नवसू गायकवाड, आनंदा झिरवाळ, बाळू तात्या, माधव पवार, तुळशीराम महाले, राजू चौधरी, जयवंत पवार, भास्कर पवार, तुकाराम जाधव, राजू पाटील, तुळशीराम खोटरे, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष रमेश थोरात, माजी सैनिक शिवराम चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे आदी उपस्थित होते. सुरगाणा तालुका क्र ीडा संकुलाचे बांधकाम रखडले आहे. तसेच पिंपळसोंडपैकी उंबरपाडा (पि) येथे अद्यापही पिण्याच्या पाण्याकरिता शासनाची विहीर नसल्याने एका खड्ड्यातील पाणी पिण्यासाठी वापरण्यात येते. येथे विहीर देण्यात यावी, अशी मागणी उखाराम चौधरी यांनी केली.खड्डे बुजवावेतजामुनमाथा ते रानपाडा या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, म्हैसखडक ते शिवपाडा रस्ता करणे, तुळशीराम खोटरे यांनी पिंपळसोंड येथे मानसेवी वैद्यकीय अधिकारी राहत नाहीत, तातापाणी येथील गरम पाण्याचे झरे विकसित करून तरु णांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. येथील सामूहिक वनदावा मंजूर करण्यात यावा आदी तक्र ारी करण्यात आल्या.
आढावा बैठकीत समस्यांचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 9:29 PM
उंबरठाण येथे झालेल्या आढावा बैठकीत नागरिकांनी वीज वितरणसह सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात तक्रारी करीत समस्यांचा अक्षरश: पाऊस पाडला.
ठळक मुद्देउंबरठाण : वीज वितरणसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात तक्रारी