मालेगाव : महानगरपालिकेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर ताहेरा रशीद शेख व आयुक्त किशोर बोर्डे यांनी संयुक्तरित्या यांनी कोरोना साथजन्य आजाराशी युद्धपातळीवर लढण्यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजन याबाबत खातेप्रमुखांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर शहरातील नागरिकांना माहिती देण्यासाठी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. शासनाच्या निर्देशानुसार आपत्कालीन स्थितीत आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.आयुक्त बोर्ड यांनी सांगितले की अनावश्यक गर्दी टाळणे, शाळा कॉलेज बंद ठेवणे, पुढील काही दिवस काळजी घेण्याचे आदेश आहेत.त्यानुसार यापूर्वीच महानगरपालिकेची सर्वसाधारण महासभा स्थिगत करण्यात येत आहे. तसेच महापालिकेत शिष्टमंडळ यांना प्रवेश तात्पुरत्या स्वरूपात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रद्द करण्यात येत आहेत असे महापौर व आयुक्त यांनी संयुक्तरीत्या सांगितले. आजपर्यंत शहरात एकही कोरोना पाँझििटव्ह रु ग्ण नाही ही सुदैवाची बाब आहे. उपायुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले की महापालिकेमार्फत मदनी नगर व सोयगाव येथे प्रत्येकी २० बेडची व मनपाच्या मालधे येथील रिकाम्या २ आयएचएसडीपी इमारतीमध्ये २०० बेडची क्वारंटाईन व्यवस्था करण्यात आली आहे. जर कोणी रूग्ण आढळून आल्यावर प्राथमिक तपासणी नंतर आयसोलेशनसाठी ३ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. वाडिया दवाखाना,सामान्य रूग्णालय, तसेच स्वताचे संसाधने कमी पडल्यास शासनाच्या निर्देशानुसार गठित उपायुक्तांसह ४ डॉक्टर यांच्या समितीद्वारे प्राप्त अहवालानुसार १९ खासगी वैद्यकीय रूग्णालयांची तपासणी करून मालेगावातील एम डी डॉक्टरची संख्या कमी आढळून आली. निकषांवर जीवन हाँस्पिटल योग्य आढळून आल्याने तेथे आयसोलेशन करता येईल .महापालिकेतर्फे कोरोना विषाणूबाबत गंभीर दखल घेण्यात येत असून त्याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. मालेगाव शहरात शासकीय व खासगी मिळुन १५ व्हेंटिलेटर आहेत, मनपा आणखी मागविण्याचा प्रयत्न करत आहे.शुक्र वार २७ मार्च पर्यंत मालेगाव शहरात कोरोनाबाधित देशातून आलेले प्रवाशांची संख्या ७१ आहे. त्यांचे आज पर्यंत १४ दिवसांचे क्वारंटाईन होवून पुर्णपणे बरे झालेले एकुण १५ जण आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांची संख्या देखील ० इतकीच आहे. सर्दी ताप खोकला असलेला एकही रु ग्ण काल अखेरपर्यंत दाखल नव्हता, जो एक जण दाखल आहे. त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.विदेशातून आलेले ७१ नागरीकशहरात गेल्या दोन सप्ताहात मालेगांवी विदेशातून दाखल झालेल्या नागरीकांची संख्या ७१ आहे. त्यात युएई येथून ३३, आॅस्ट्रेलिया-३, इराण-२, मस्कत-ओमान-१, रशिया-२, कुवेत- ५, सौदी- ८, चीन- १, अबुधाबी-१, हॉंग कॉंग- २, नेपाळ- ३, सिंगापूर (जकार्ता)- २, यु.एस.ए.- १, यु.के.- ३, अरमानीया- १, इंडोनेशिया- २, व इतर- १ असे एकुण ७१ परदेशातून आलेले नागरीक आहेत. त्यांचेवर मनपा प्रशासनाचे पुर्णत: लक्ष आहे. त्यामुळे शहरात काल पर्यंत एक ही कोरोना बाधित रु ग्ण नाही. नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन मनपा आयुक्त बोर्डे यांनी केले आहे.बैठकीला माजी महापौर रशीद शेख, उपमहापौर निलेश आहेर, उपायुक्त (प्रशासन) नितीन कापडणीस, उपायुक्त (कर) रोहिदास दोरकुळकर, सहायक आयुक्त स्वच्छता वैभव लोंढे, सहायक आयुक्त तुषार आहेर, आरोग्य अधिकारी डॉ. सायका अन्सारी, डॉ.भीमराव त्रिभुवन, विद्युत अधिक्षक अभिजित पवार, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी, प्रमुख स्वच्छता निरीक्षक उमेश सोनवणे, स्वच्छता निरीक्षक प्रेम शिंदे आदी उपस्थित होते.
मालेगावा मनपात कोरोनाबाबत आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 3:16 PM