यावेळी नरहरी झिरवळ यांनी उद्योग-व्यापार सेल हा समाजासाठी महत्वाचा घटक असून, पक्षबांधणी सूक्ष्म पद्धतीने करावी व सर्व समाजातील घटकांना न्याय दयावा, असे सांगितले. श्रीराम शेटे यांनी सांगितले, नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो व कांदा ही नगदी पिके प्रामुख्याने घेतली जातात; परंतु व्यापारी सुरुवातीला विश्वास संपादन करतात व नंतर शेतकऱ्यांचे पैसे बुडूवून पसार होतात. अशा बऱ्याच केसेस नाशिक जिल्ह्यात व महाराष्ट्रातील काही भागात घडल्या आहेत. या सेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असेही त्यांनी आवाहन केले. यावेळी नागेश फाटे यांनी व्यापारी वर्गाचे ओळखपत्रासह विमा संरक्षणसंदर्भात तसेच तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी कादवाचे संचालक शहाजी सोमवंशी , विश्वनाथ देशमुख , मधुकर गटकळ ओझरखेड सरपंच गंगाधर निखाडे,राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब गणोरे, पंढरपूर तालुका उपाध्यक्ष कल्याण कुसूमडे आदी पदाधिकारी उपस्थित होते .
राष्ट्रवादी उद्योग व्यापारी सेलची आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:32 AM