चांदवड : उपविभागाचे प्रभारी प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी कोरोना प्रतिबंधसंदर्भात फेसबुक मेसेंजर व्हिडीओ चॅटिंगद्वारे विविध विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली व उपविभागात यासंदर्भात चालणाºया उपाययोजनांची माहिती घेतली.ग्रुप व्हिडीओ कॉलद्वारे सर्व संबंधित अधिकाºयांनी त्यांचे कार्यालयातून या डिजिटल बैठकीस उपस्थिती लावली. चांदवड नगरपालिकेने घरपोहोच भाजीपाला व किराणा देण्याची कार्यवाही ही यापुढेही तशीच सुरू ठेवावी अशी सूचना त्यांनी दिली. शालेय पोषण आहार वाटप व अंगणवाडीमधील शिधा वाटप करताना आवश्यक ते अंतर ठेवून पालकांनाच ते वाटप करावे व गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. याबद्दल गटशिक्षणाधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. गृह विलगीकरण करण्यात आलेल्या रु ग्णांचा वेळोवेळी आढावा घ्यावा, अशी तालुका आरोग्य अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.या ग्रुप व्हिडीओ कॉलद्वारे घेतलेल्या बैठकीस चांदवड व देवळा तालुक्यातील प्रमुख तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. त्यात चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील, मुख्याधिकारी अभिजित कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे, गटविकास अधिकारी महेश पाटील, देवळा तालुक्याचे तहसीलदार दत्तात्रय शेजूळ, संदीप भोळे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे आदी अधिकाºयांचा समावेश होता.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतला व्हिडीओ कॉलद्वारे बैठकीतून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 10:21 PM