रस्ते, आरोग्य, स्वच्छता, वीज, पाणीपुरवठा आदी कामकाजाचा आढावा महानगरपालिकेच्या प्रभाग क्रं. १ येथील कार्यालयात राज्याचे कृषी मंत्री भुसे यांनी घेतला. यावेळी भुसे बोलत होते. याप्रसंगी महानगरपालिकेचे आयुक्त त्र्यंबक कासार, उपमहापौर निलेश आहेर, स्थायी समिती सभापती राजाराम जाधव, प्रभाग १ च्या सभापती कविता वाघ, आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे, प्रभाग अधिकारी हरिष डिंबर आदी उपस्थित होते. यावेळी नगरविकास अधिकारी कैलास बच्छाव यांनी प्रभाग १ मधील रस्त्यांचा विकास, भुयारी गटारी, मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने प्रभागात सुरु असलेल्या विविध विकास कामांबाबत माहिती दिली. रस्ते दुरुस्ती व स्वच्छता संदर्भात येत्या पंधरा दिवसात निर्णय घेण्यात यावा, तसेच आग्रा रोड, कॅम्प रोड, सटाणा रोड, स्वच्छ करणे व काटेरी झुडपे काढण्यासाठी मदत लागल्यास दोन जेसीबी उपलब्ध करुन देण्याचे आवाहन भुसे यांनी यावेळी केले, तर बंद अवस्थेतील पथदिवे हे येत्या दहा दिवसात दुरुस्तीचे कामे करुन चालू करण्याचे आदेशही दिले. आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी १६ जानेवारीपासून सुरु करण्यात आलेल्या कोविड लसीकरणाची सविस्तर माहिती यावेळी दिली
इन्फो
नगरसेवकांची नाराजी
बैठकीला उपस्थित असलेल्या नगरसेवकांनी सुरु असलेल्या विकासकामांबाबत असमाधान व्यक्त करत कृषी मंत्री भुसे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. महानगरपालिकेकडून प्रभागात पुरेसा विकास निधी मिळत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.