शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

सिन्नर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 9:31 PM

सिन्नर: आमदार माणिकराव कोकाटे यांनी माजीप्रा च्या कार्यलयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा शहासह भरतपूर, लक्ष्मणपूर, कोळगाव, मिरगाव, मिठसागरे, रामपूर या सात गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांचा आरखडा तयार करून मंजुरीसाठी पाठवावा तसेच वावीसह 11 गाव पाणीपुरवठा योजनेत घोटेवाडी व माळवाडी या गावांचा अंतर्भाव करण्याच्या सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या.

ठळक मुद्देसिन्नर व इगतपुरी मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांची आढावा बैठक

सिन्नर: आमदार माणिकराव कोकाटे यांनी माजीप्रा च्या कार्यलयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा शहासह भरतपूर, लक्ष्मणपूर, कोळगाव, मिरगाव, मिठसागरे, रामपूर या सात गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांचा आरखडा तयार करून मंजुरीसाठी पाठवावा तसेच वावीसह 11 गाव पाणीपुरवठा योजनेत घोटेवाडी व माळवाडी या गावांचा अंतर्भाव करण्याच्या सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या.महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाच्या नाशिकरोड येथील कार्यालयात सिन्नर व इगतपुरी मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांची आढावा बैठक सोमवारी पार पडली. त्यावेळी आमदार कोकाटे बोलत होते. शहासह सात गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी कडवा कालव्याच्या टेलला रामपूर-पुतळेवाडी शिवारात एमआय टँक अथवा पाझर तलावात उद्भव विहीर करण्याच्या सूचना आमदार कोकाटे यांनी केल्या. दरम्यान, भोजापूर धरणातून राबविण्यात आलेल्या मनेगावसह सोळा गावे पाणीपुरवठा योजनेत मनेगावसह पाटोळे, आटकवडे, देवपूरसह धारणगाव, भोकणी व बारागावपिंप्रीसह सात गावांच्या योजने गुळवंच व निमगाव सिन्नरला या गावांच्या स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. गुळवंचमधून दगडवाडीसाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकून जलकुंभाचे बांधकाम करण्यात यावे आणि हिवरगाव, घंगाळवाडीला नव्या जलवाहिनी टाकून तिथ्लृेही जलकुंभ बांधण्यात यावा असेही आमदार कोकाटे यांनी सुचविले.ज्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामाची मुदत संपली. मात्र काम अद्याप अपूर्ण आहे अशा ठिकाणी ठेकेदार किंवा अधिकारी यांना जबाबदार धरले जाईल. अडचणी असल्याच्या पोलिस बंदोबस्त घेऊन काम पूर्ण करा. जनतेचे पाण्यासाठी हाल होणार नाही. याकडे लक्ष द्या, अशा शब्दात त्यांनी अधिकार्‍यांना खडसावले. यावेळी मजीप्रचे मुख्य अभियंता लांडगे, कार्यकारी अभियंता मोरे, जि. प. उपअभियंता घुगे आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :sinnar-acसिन्नरwater transportजलवाहतूक