नाशिक: कोरानाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्वप्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. या दोन दिवसात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई देखील करण्यात येणार असून सक्षम कारण असल्याशिवाय नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही.
शासनाच्या आदेशानुसार पुढील दोन दिवास निर्बंध कठोरपणे लागू केले जाणार आहेत. शहरात कोरोनाचे रूग्ण हजारोंच्या संख्येने आढळत असल्याने कोरोनाची साखळ तोडण्यासाठी जिल्हा पातळीवर काही निर्बंध कठोर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे शनिवर दि. १० आणि रविवार दि.११ रोजी अत्यावश्यक सेवाच फक्त सुरू राहतील. इतर आस्थापनांना यापूर्वी लागू असलेले नियम कायम राहाणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहाणार असली तरी नागरिकांना आपत्कालीन व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहे.
दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आलेली असली तरी कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांची दुकाने कोरोना अधिसुचना लागू असेपर्यंत बंद करण्याची कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आ हे.
---इन्फो--
१) मॉलमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहतील. सकाळी ७ ते रात्री ८ ही वेळ मर्यादा त्यांना लागू राहाणार आहे. मात्र मॉलमधील अत्यावशयक सेवा वगळता इतर दुकाने बंद राहतील.
२) बाजार समित्या सुरू राहतील परंतु गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात येऊन कोराना निर्बंधाचे पालन करण्याबाबतची कार्यवाही करणे अपेक्षित आहे. असे आढळले नाही. किंवा गर्दी झालीच तर बाजार समित्यांवरही कारवाई होऊ शकते.
३) बांधकाम क्षेत्राला परवानगी देण्यात आलेली असल्यामुळे बांधकामे सुरळीत सुरु राहतील. मात्र बांधकाम साहित्याची दुकाने बंदच राहतील. त्यांना परवानगी देण्यात आलेली नाही.
४) सर्व प्रकारची वाहतूक सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असल्यामुळे संबंधित फक्त गॅरेजेस् सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र स्पेअर पार्टस्ची दुकाने बंद राहतील त्यांना परवानी देण्यात आलेली नाही.
५) नागरिकांना विनाकारण बाहेर फिरण्यास मनाई असल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांनाच फक्त परवानगी असेल. केंद्र आणि राज्य शासनाचे कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेतील कॅटेगरीत नाहीत. मात्र आरोग्य, पोलीस तसेच कोरोना वॉरिअर्स म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मुभा देण्यात आलेली आहे.
६) मद्यपींना बार मधून मद्य मागविता येऊ शकते.
७) मद्य दुकाने पूर्वीप्रमाणेच बंद राहतील.
८) फुड पार्सलला फक्त परवानगी असणार आहे.
९) ई-सेवा केंद्रे, पासपोर्ट तसेच शासकीय दस्ताऐवज देणारी केंद्रे सुरू राहतील मात्र सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीतच
१०) इलेक्ट्रीकक्सची दुकाने बंदच राहाणार आहेत.मोबाईल, लॅपटॉपची दुकानेही बंद राहातील.