माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे, संस्थेचे अध्यक्ष व कादवा कारखान्याचे संचालक दिनकर जाधव, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर वडजे यांच्या नेतृत्वाखाली आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली.
जलसिंचन योजनेचे अभ्यासक रमेश वडजे यांनी सांगितले की, या योजनेस पंचवीस वर्षे झाल्याने, अनेक ठिकाणी पाइपलाइन खराब झाली असून, दुरुस्तीची गरज आहे. संपूर्ण योजनेचे नूतनीकरण केल्यास उमराळे, जांबुटके, मडकीजांब,या तिन्ही गावातील ६३५ हेक्टर शेत जमिनीला या उपसा जलसिंचन योजनेचा लाभ होणार आहे.
यावेळी मोरे साहेब, दरगोडे साहेब, मा.उपाध्यक्ष निवृत्ती बोराडे, डॉ.पुंडलिक धात्रक, एस.टी. पाटील सर, शशिकांत गामणे, रघुनाथ गामणे, मडकीजांबचे उपसरपंच बाकेराव बोराडे, उमराळे शेतकरी सोसायटीचे चेअरमन रामदास धात्रक, जांबुटके गावचे अनिल अपसुंदे, मडकीजांब सोसायटी संचालक सचिन वडजे, सुनील सोमवंशी आदींनी चर्चेत भाग घेतला व तिन्ही गावांच्या शेतीच्या विकासासाठी झिरवाळ यांनी शासकीय निधीतून योजना पुनर्जीवित करून, अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी केली.
झिरवाळ यांनी शेतीसाठी पाण्याचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असून, संपूर्ण तालुक्याचे पाण्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांनी आपले हक्काचे पाणी मिळविण्यासाठी रीतसर पाणी परवानग्या घ्याव्यात व आपली मागणी नोंदवावी. सर्व धरणांची साठवण क्षमता वाढविण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. उमराळे उपसा जलसिंचन योजनेबाबत लवकरच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे समवेत शेतकऱ्यांची बैठक आयोजित करून उमराळे उपसा जल सिंचन योजनेला शासकीय मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
याप्रसंगी मधुकर नाना वडजे, बाळासाहेब वडजे, भाऊसाहेब वडजे, शरद वडजे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
250721\25nsk_43_25072021_13.jpg
दिंडोरीत झिरवाळ यांच्याशी चर्चा करताना शेतकरी.