लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : मोदी सरकारच्या कामगार विरोधी-जनविरोधी व देशविरोधी धोरणाच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी सीटूच्या वतीने आॅगस्टक्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात ‘भारत बचाव’ आंदोलन करण्यात आले.मोदी सरकारच्या धोरणामुळे कामगार, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवक आदी सर्वांची वाताहत झाली आहे. बेरोजगारांना काम नाही, काम करूनही वेतन मिळत नाही. असंघटित क्षेत्रातील कामगारांना जगण्यासाठी केंद्र सरकारने कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत केलेली नाही. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने जनतेला दिलासा दिला पाहिजे. आयकर लागू नसलेल्या कुटुंबांना दरमहा साडेसात हजार रु पये आर्थिक मदत, वेतन कपात व कामगार कपातीवर बंदी आणावी.शेतमजुरांना मनरेगामार्फत दोनशे दिवस काम द्यावे लॉकडाऊन काळातील वीज बील माफ करा, आदींसह विविध मागण्यांसाठी कामगार संयुक्त कृती समितीच्या निर्णयानुसार सिटूच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. डी. एल. कराड यांनी केले.
क्रांतिदिन : पूर्वसंध्येला ‘भारत बचाव’ची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 10:57 PM
सातपूर : मोदी सरकारच्या कामगार विरोधी-जनविरोधी व देशविरोधी धोरणाच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी सीटूच्या वतीने आॅगस्ट क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात ‘भारत बचाव’ आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देशेतमजुरांना मनरेगामार्फत दोनशे दिवस काम द्यावे