मालेगाव : ‘कोरोना’सारख्या जीवघेण्या विषाणूने जिल्ह्यासह संपूर्ण देश व राज्यात थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांचे जीवनावश्यक वस्तूंसाठी हाल होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकाºयांच्या पुढाकाराने मालेगावकरांसाठी दहा हजार किलो तांदळाची मदत करण्यात आली आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गाचे एका टप्प्यातील काम करणाºया अॅफकॉन्स कंपनीचे सहकार्य लाभले आहे.यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, उपजिल्हाधिकारी विठ्ठलराव सोनवणे, अॅफकॉन्स कंपनीचे शेखर दास आदी उपस्थित होते.यावेळी मालेगावकरांना उद्देशून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले, नागरिकांच्या मूलभूत अडचणी सोडविण्यास स्थानिक प्रशासन कटिबद्ध आहे. मालेगाव तालुक्यात ‘कोरोना’बाधित एकही रुग्ण आजतागायत आढळून आलेला नाही. ही आनंदाची बाब आहे. याचे सर्व श्रेय स्थानिक प्रशासनासह संपूर्ण मालेगाव तालुक्यातील नागरिकांना जाते. तरी देखील काही भागात नागरिक अन्न व पाण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. अशा नागरिकांनी घराबाहेर पडणे हे केवळ आपल्याच नाही तर समाजातील इतरांच्याही जीवाशी खेळण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.आपत्ती काळात ज्या काही सेवाभावी संस्था मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यांच्याशी समन्वय साधून मदत घेण्यात येत आहे. तर प्रशासनामार्फत प्रभावित झालेल्या गरजू लाभार्थी ज्यांना शासनाकडून कुठलाही लाभ मिळत नाही, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, हात मजुरी, शेतमजूर असे नागरिक ज्यांचे हातावर पोट आहे, अशा तळागाळातील लाभार्थींसाठी सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून दहा हजार किलो तांदूळ मालेगावकडे रवाना करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मालेगावकरांसाठी तांदूळ रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 11:54 PM
‘कोरोना’सारख्या जीवघेण्या विषाणूने जिल्ह्यासह संपूर्ण देश व राज्यात थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांचे जीवनावश्यक वस्तूंसाठी हाल होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकाºयांच्या पुढाकाराने मालेगावकरांसाठी दहा हजार किलो तांदळाची मदत करण्यात आली आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गाचे एका टप्प्यातील काम करणाºया अॅफकॉन्स कंपनीचे सहकार्य लाभले आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार : घराबाहेर न पडण्याचे आवाहन