घोटी : भातशेती आण िपावसाची चेरापुंजी म्हणून इगतपुरी ओळखली जाते. झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांचे तसेच शेतजमिनीचे नुकसान झाले. जमिनीचे बांध फुटून अनेक पिकांमध्ये मातीचा पोयटा वाहून आला.आधीच भातलागवड उशिरा झालेल्या पावसामुळे लांबली. त्यातच पावसाने दांडी मारल्यामुळे लांबली होती. दोन दिवसाच्या अतिवृष्टीने बर्याच प्रमाणात शेताची नासाडी झाली. भात हे शेतकर्याची वर्षाचे पीक आहे. शेतकरी खरीप हंगामात भाताचे उत्पन्न घेऊन ते विकून त्यातील नफ्यातून रब्बी हंगामात पिके घेतो. यंदाच्या वर्षी बर्याच प्रमाणात भातशेती उशिरा लागवड झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होता.आता ती चिंता अजून वाढली आहे. इतर पिकांचे रोपे नर्सरी मध्ये मिळतात परंतु भाताचे पीक नर्सरी मध्ये मिळत नाही. बर्याच ठिकाणी शेतकर्यांनी आधीच दुबारपेरणी केली होती. आता शेतकरी पंचनामे करून भरपाईची मागणी करत आहेत.
अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 6:26 PM