नाशिक : हनुमानवाडी कॉर्नरवरील मखमलाबाद रस्त्यावर भेळभत्ता विक्रीचा व्यवसाय करणार्या वाघ बंधूंवर सराईत गुन्हेगारांच्या टोळीने हल्ला करुन दीड वर्षांपुर्वी सुनील वाघ यास ठार मारले होते व हेमंत वाघ हे या हल्ल्यात थोडक्यात बचावले. या हल्ल्यातील फरार संशयित सराईत गुंड किरण नागरेच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना रविवारी रात्री यश आले.दीड वर्षांपुर्वी हनुमानवाडी कॉर्नर येथे दोघा भावंडांवर प्राणघातक हल्ला करून सुनील याच्या खूनात फरार असलेला जाणता राजा कॉलनीतील सराईत गुन्हेगार किरण दिनेश नागरे (३५ ) याला पंचवटी पोलिसांनी मखमलाबाद शिवारातून अटक केली.नागरे हा गेल्या दीड वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता. पंचवटी पोलीस व गुन्हे शोध पथक नागरेच्या मागावर होते; मात्र नागरे पळून जाण्यास यशस्वी होत होता. गुप्त माहितीच्या आधारे पंचवटी पोलिसांनी मखमलाबाद शिवारात सापळा रचला. नागरे यासा शिताफीने अटक करत बेड्या ठोकल्या. या प्राणघातक हल्ल्यात व खूनामध्ये कुविख्यात आरोपी कुंदन सुरेश परदेशी, राकेश कोष्टी, जया दिवे, व्यंक्या मोरे, अक्षय इंगळे, अजय बागुल व अन्य आरोपींना अटक केली होती. यामधील नागरे हा फरार होता. त्याच्या मागावर पोलीस होते. यामध्ये काही आरोपींवर मोक्कान्वये कारवाईदेखील करण्यात आली आहे. टोळी यूध्दातून हा गुन्हा घडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वाघ खून प्रकरणातील फरार संशियत नागरे हा मखमलाबाद शिवारात येणार असल्याची खात्रीशिर गुप्त माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना मिळाली त्यानंतर तत्काळ पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, हवलदार सचिन म्हस्दे, सतीश वसावे, जितू जाधव, दशरथ निंबाळकर आदिंचे पथक मखमलाबाद शिवारात पाठविण्यात आले. पोलिसांनी परिसरात सापळा रचला व कोणतीही चूक न करता नागरेला रविवारी रात्री साडेनऊ वाजता ताब्यात घेतले.
भेळविक्रेत्याची हत्त्या करणार्या टोळीमधील दीड वर्षांपासून फरार असलेल्या सराईत किरणच्या आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:43 PM
नाशिक : हनुमानवाडी कॉर्नरवरील मखमलाबाद रस्त्यावर भेळभत्ता विक्रीचा व्यवसाय करणार्या वाघ बंधूंवर सराईत गुन्हेगारांच्या टोळीने हल्ला करुन दीड वर्षांपुर्वी सुनील वाघ यास ठार मारले होते व हेमंत वाघ हे या हल्ल्यात थोडक्यात बचावले. या हल्ल्यातील फरार संशयित सराईत गुंड किरण नागरेच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना रविवारी रात्री यश आले.दीड वर्षांपुर्वी हनुमानवाडी ...
ठळक मुद्देकुविख्यात आरोपी कुंदन सुरेश परदेशी, राकेश कोष्टी, जया दिवे, व्यंक्या मोरे, अक्षय इंगळे, अजय बागुल व अन्य आरोपींना अटक केली होती. यामधील नागरे हा फरार होता. पंचवटी पोलिसांनी मखमलाबाद शिवारातून अटक केली.नागरे हा गेल्या दीड वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता. पोलिसांनी परिसरात सापळा रचला व कोणतीही चूक न करता नागरेला रविवारी रात्री साडेनऊ वाजता ताब्यात घेतले.