याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मालेगावातील शिरीष रमेश मोरे ऊर्फ बंडू मोरे. रिक्षाचालक ते ट्रान्सपोर्ट मालकपर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास थक्क करणारा, इतरांना प्रेरणादायी असा आहे.
बंडू मोरे यांचे बालपण अतिशय खडतर परिस्थिती गेले. वडील बालपणापासूनच अंधत्वाचे शिकार झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह, दोन मुलांचे शिक्षण करण्याची जबाबदारी आईने पेलली. दोन रूमच्या घरातच छोटेसे किराणा दुकान उघडून जमेल त्या पद्धतीने कुटुंबाचा गाडा हाकलला. बंडू यांनी जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण केले, पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालखीची असल्याने व मोठ्या भावाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी बंडू ने स्वतःच्या शिक्षणावर पाणी सोडले. भाड्याने रिक्षा घेऊन रिक्षाचालक होऊन जमेल तेवढी कुटुंबाला आर्थिक मदत करू लागला.१९९६-९९ हे तीन वर्षे रिक्षाचालक म्हणून काम पाहिले. वडिलांचे आजारपणाचा सततचा खर्च त्यामुळे रिक्षा चालवून परिस्थितीत बदल होणार नाही हे लक्षात घेऊन त्याने जॉब करण्याचे ठरविले; पण दहावी पासला कोण कामावर घेणार? तरी प्रयत्नवादी बंडू ने ‘सुरत-जळगांव ट्रान्सपोर्ट’ काम मिळविलेच. महिन्याला ८५० रुपये पगार ठरला. धंद्याचे बारकावे, अडचणी यांचा चांगला अभ्यास झाला. त्यातूनच पुढे स्वतःचे ट्रान्सपोर्ट उघडण्याची कल्पना आली आणि बंडूचा बंडू शेठ होत ‘प्रथमेश रोडलाईन्स’ची स्थापना केली. जळगाव ते मालेगाव सेवा चालू केली. सर्व्हिस व दर चांगले दिल्यामुळे लोकांचा बंडूशेठ वरचा विश्वास वाढला. मग व्यापारी लोकांनी अधिक धंदा वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे प्रथमेश रोडलाईन्सचा कारभार मालेगाव ते जळगाव सीमित न राहता महाराष्ट्रभर पसरला. प्रामाणिकपणा, विश्वास यामुळे पाहता पाहता व्यवसाय परराज्यात वाढला व दुसऱ्या ‘पवन लॉजिस्टिक’ ची स्थापना केली. आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह, गुजरात, राजस्थान येथे बंडूशेठच्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाची घोडदाैड चालू आहे. बंडू मोरे यांचा वार्षिक टर्नओव्हर ५ कोटी आहे. ट्रक ड्रायव्हर, क्लीनर, हमाल, टेम्पोवाले अशा १६० लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला.
फोटो आहे....२६ बंडू मोरे
260821\503926nsk_31_26082021_13.jpg
२६ बंडू मोरे