चौकट
या ठिकाणी रिक्षाचालकांची मनमानी
नाशिकरोड बसस्थानक -बसस्थानक आणि रेल्वेस्टेशन जवळच असल्याने या परिसरात अनेक रिक्षा अस्ताव्यस्तपणे उभ्या राहातात. अनेकवेळा तर थेट बसस्थानकाच्या आवारात रिक्षा घुसविल्या जातात. वारंवार प्रवाशांना कुठे जायचे याची विचारणा केली जाते. यामुळे अनेक प्रवासी त्रस्त होत असतात.
नाशिकरोड ते शालीमार - नाशिक-पुणे महामार्गावर नाशिकरोड ते शालीमार दरम्यान अनेक वसाहती आहेत. या मार्गावर अनेक रिक्षाचालक कधी लेफ्ट कधी राईटने मनमानी पद्धतीने रिक्षा चालवित असतात. यामुळे वाहतुकीस अडथळा तर होतोचज; पण अनेकवेळा प्रवाशांचाही नेमके कोणत्या रिक्षात बसावे असा गोंधळ उडतो. या मार्गावर अनेक रिक्षाचाल प्रवाशांची चढउतार करत असतात.
निमाणी बसस्थानक - निमाणी बसस्थानक परिसरातही रिक्षाचालकांनी मनमानी सुरू असते. या ठिकाणी रस्ता अरुंद त्यात सुरू असलेली शहर वाहतुकीच्या बसेसची ये-जा यामुळे नेहमी वाहतूक कोंडी होत असते. अनेकवेळा बसस्थानकाच्या प्रवेशव्दारासमोरच रिक्षा उभ्या केल्या जातात किंवा प्रवासी उतरविले जातात. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची पळवापळवी सुरू असते.
चौकट-
मनमानी भाडे
शहरात टेरीफप्रमाणे आणि शेअरिंग अशा दोन्ही पद्धतीने रिक्षा वाहतूक सुरू आहे. विशेषत: मीटरप्रमाणेच भाडे आकारावे असा नियम असला तरी रिक्षाचालक मनमानी पद्धतीने भाडे आकारत असतात. कोविडनंतर तर अनेक ठिकाणचे भाडे वाढविण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
चौकट-
प्रवाशांना त्रास
कोट-
एखाद्या बसस्थानकावर दोन प्रवासी उभे असले तरी त्याठिकाणी अनेक रिक्षाचालक थांबतात. काहीवेळा तर रस्त्यावरून येणाऱ्या प्रत्येक रिक्षाचालकाला कुठे जायचे आहे, याचे उत्तर देऊन प्रवासी त्रस्त होतात. पाच मिनिटेही शांत उभे राहू दिले जात नाही. - प्रशांत पवार, प्रवासी
कोट-
आपल्याला जिकडे जायचे असते त्या भागात अनेक रिक्षाचालक जात नसले तरी त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागते. काहीवेळा तर सुट्या पैशांवरून तर खूप कटकट होते. - योगेश जाधव, प्रवासी
कोट-
गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षाचालकांना प्रवासी भाडे वाढवून देण्यात आलेले नाही. पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शिवाय गाड्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. यामुळे परिवहन अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने रिक्षाची दरवाढ करायला हवी - हैदर सय्यद, भद्रकाली ऑटोरिक्षा युनियन
कोट-
गेल्या अनेक वर्षांपासून मीटरची भाडेवाढ न झाल्याने मीटरप्रमाणे चालणाऱ्या प्रामाणिक रिक्षाचालकांचे नुकसान होत आहे. हकीम समितीने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे दरवाढ झाल्यास रिक्षाचालकांना व्यवसाय करणे सोयीचे होईल. - शिवाजी भोर, रिक्षा युनियन