नाशिक : रिक्षावरील कारवाईमुळे संतप्त तिघा रिक्षाचालकांनी वाहतूक शाखेच्या कार्यालयात आरडाओरड करीत पोलिसांना शिवीगाळ केल्याची घटना मंगळवारी (दि़४) रात्रीच्या सुमारास घडली़ या प्रकरणी तिघांवर सरकारवाडा पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकावर (एमएच १५ एफयू ०८७८) कारवाई केली होती़ यावेळी संशयित अक्षय कल्याण अहिरे (२४, रा. शिवाजीनगर, सातपूर), ज्योती समाधान गायकर (३१, रा. वरीलप्रमाणे) व योगेश मुरलीधर अहिरे (३६, रा. समर्थ सोसायटी, दिघे रोड, भोसरी, पुणे) यांनी शहर वाहतूक शाखा युनिट दोनच्या कार्यालयात आरडाओरड व पोलिसांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला होता़मोबाइल क्रमांक विचारण्याच्या बहाण्याने चोरीनाशिक : मोबाइल क्रमांक विचारण्याच्या बहाण्याने एका संशयित महिलेने घरातील सोफ्यावर ठेवलेला महागडा मोबाइल चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़४) दुपारच्या सुमारास महात्मानगर परिसरातील घडली़ या प्रकरणी प्रांजल पाटील (१९, रा. १, रेखाकृती सोसायटी) यांच्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़डोक्यात बाटली फोडल्याने तरुण जखमीनाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रगती हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या बिपीन शशिकांत दाणी (३१, सिद्धटेक सोसायटी, काठे गल्ली) या तरुणाच्या डोक्यावर दुचाकीवरील (एमएच १५, बीक्यू ८६६७ ) तिघांनी बाटली फोडून तसेच मारहाण करून जखमी केल्याची घटना मंगळवारी (दि़४) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली़ यामध्ये बिपीन दाणी हा तरुण जखमी झाला असून, या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़शहर बसच्या बॅटऱ्यांची चोरीनाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या पंचवटी बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या शहर बसच्या (एमएच २०, डी ९४०८) १२ हजार रुपयांच्या दोन बॅटºया चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ३ व ४ डिसेंबरच्या दरम्यान घडली आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.