अवैध उत्खनन रोखण्याचे आव्हान
नाशिक : जिल्ह्यातील अवैध उत्खनन रोखण्याबरोबरच महसूल वाढविण्यासाठीचे प्रयत्न खनिकर्म विभागाकडून केले जात आहे. त्यानुसार, विशेष पथक तयार करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर डोंगराजवळील अवैध उत्खनन रोखण्यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच महसूल वसुलीसाठीही व्यापक वसुली मोहीम सुरू करण्यात आलेली आहे.
महापालिकेची उद्याने अजूनही बंदच
नाशिक: शहरातील महापालिकेची अनेक उद्याने अजूनही बंदच आहेत. अनेक उपनरांमध्ये उद्याने असली, तरी त्यातील बहुसंख्य उद्याने ही कुलूपबंदच आहेत. काही उद्यानांमध्ये दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत, तर काहींची कामे अजूनही सुरू आहे. असे असले, तरी उद्याने मात्र खुली झालेली नाहीत.
माजी विद्यार्थ्यांचा ऑनलाइन मेळावा
नाशिक: क.का. वाघ विद्यालयीतील विद्यार्थ्यांचा मेळावा येत्या रविवारी आयोजित करण्यात आला आहे. गीताई वाघ कन्या विद्यालय, क.का. वाघ माध्यमिक विद्यालय, तसेच विद्याभव याा विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने दुपारी ३ वाजता होणाऱ्या मेळाव्यात सहभागी व्हावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
बर्ड फ्लूविषयी नागरिकांना भीती
नाशिक : स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू रोगाचे लक्षणे आढळून आल्यानंतर सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. आरोग्य यंत्रणांकडूनही दक्षता घेण्याबाबतचे आवाहन केले जात असताना, नागरिकांमध्ये मात्र काहीशी भीतीही असल्याचे दिसते. अद्याप मानवी शरीरात याबाबतचे लक्षणे दिसत नसली, तरी नागरिकांकडून काळजी घेतली जात आहे.
शंकरनगर-टाकळी रस्ता नादुरुस्त
नाशिक : शंकरनगर ते टाकळी या रस्त्यावरील शंकरनगर कॉर्नर येथील रस्ता नादुरुस्त झाला आहे. या मार्गावरील चौकातही नेहमीच खोदकाम केले जात असल्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी जेसीबीच्या लोखंडी पंजामुळे रस्ता खराब झाल्याचे दिसते. सदर रस्त्यावर डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.