२) ग्रामीण भागातील बसस्थानकांचा ताबा जनावरांनी घेतलेला दिसतो. दिंडोरी, वणीसारख्या स्थानकांवर जनावरांचा वावर दिसून येतो.
--इन्फो--
दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहे आणि बंद अवस्थेतील विश्रांतिगृहे
१) स्वच्छतागृहाबाबतीतील तक्रारी अजूनही कायम आहेत. प्रवाशांचा बेजबाबदारपणादेखील कारणीभूत आहे.
२) अनेक प्रवासी स्वच्छतागृहाचा वापर चुकीच्या पद्धतीने करतात. त्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी स्थानकात वाहत असते.
३) मेळा स्थानकात चालक-वाहकांसाठी असलेले विश्रांतिगृह बंद करण्यात आलेले आहे. कॅन्टीनदेखील बंद आहे.
४) येथील बसेसचा प्लॅटफार्म दर्शविणाऱ्या इलेक्ट्रिक तक्ता पूर्णपणे निकामी झालेला असून, त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
--कोट--
सध्या कोरोनाचा काळ असल्याने स्थानकात स्वच्छता असेल असे वाटले होते; परंतु पहिल्यासारखीच परिस्थिती दिसते. खरे तर स्वच्छतेच्या बाबतीत अपेक्षित काळजी घेतली जात नसल्याचे दिसते. गाडीची वाट पाहणे बसणे म्हणजे दुर्गंधीचा त्रास सहन करण्याशिवाय पर्याय नसतो.
- नरेंद्र बोडके, प्रवासी
--कोट--
बसस्थानकांची परिस्थिती अजूनही बदलेली नाही. स्वच्छता कुठेच दिसत नाही. पाण्याचे नळ, कचरा टाकण्यासाठीचे डस्टबिन दिसत नाही, दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृह ही परिस्थिती नेहमीच दृष्टीस पडते. स्थानकांचा आवार मोठा असल्याने जागेचे योग्य नियोजन केले तर स्वच्छता राखता येऊ शकते.
- अंजली खरात, प्रवासी