घोटी : कसारा घाट तसेच वैतरणा येथील मुसळधार पावसाने दरड कोसळण्याच्या घटना घडल्यानंतर शुक्रवारी (दि.१२) भावली धरणावरून जाणाऱ्या भंडारदरा मार्गावर दरड कोसळली. त्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.पावसामुळे ओसंडून वाहणाºया धबधब्यांमुळे पर्यटकांचा ओढा दिवसागणिक वाढत आहे. शुक्रवारी भावली धरणालगत भंडारदराकडे जाणाºया रस्त्यावर जोरदार पावसामुळे डोंगर कपारीचा काही भाग कोसळून महामार्ग बंद झाला होता. या महामार्गास पर्यायी रस्ता खूपच दूरचा असल्याने तातडीने कोसळलेली दरड काढणे गरजेचे होते. सदर घटनेची माहिती मिळताच बांधकाम विभागाचे सहायक अभियंता कौस्तुभ पवार यांनी तत्काळ कर्मचाऱ्यांना घटनास्थळी रवाना करीत जेसीबीद्वारे मार्गातील अडथळा दूर केल्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
भंडारदरा मार्गावर दरड कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 1:29 AM