शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

अस्वच्छतेविरोधात कठोर नियमावली

By admin | Published: December 23, 2014 12:43 AM

पालिकेकडून कार्यवाही सुरू : आयुक्तांनी शिक्कामोर्तब केल्यास येत्या महासभेत येणार प्रस्ताव

नाशिक : शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात कठोर नियमावली तयार करण्याचे काम महापालिकेच्या आरोग्यविभागाकडून सुरू असून, आयुक्तांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर येत्या महासभेत त्यासंबंधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. ‘अमुल्या क्लिन अप’ची मुदत संपुष्टात आल्यानंतर महापालिकेने आता ठेका देण्याऐवजी स्वत:च नव्याने कठोर नियमावली तयार करून त्याच्या अंमलबजावणीचे संकेत दिले आहेत. शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी महापालिकेने मुंबई, सुरतच्या धर्तीवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेऊन त्यासाठी ‘अमुल्या क्लिन अप’ या खासगी संस्थेला ठेका देण्यात आला होता. सदर ठेकेदाराला विनानिविदा काम देण्यात आल्याने नगरसेवकांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला होता. परंतु सदस्यांच्या विरोधानंतरही जानेवारी २०१३ मध्ये अमुल्या क्लिन अप या संस्थेला महापालिका कार्यक्षेत्रात दंडात्मक कारवाईचे अधिकार देण्यात आले होते. परंतु या संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून ठराविक भागातच दंडाची वसुली केली जात असल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. दंडात्मक कारवाईच्या नावाखाली पैसे उकळण्याचेही प्रकार घडत असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. प्रामुख्याने ठक्कर बाजार बसस्थानकावर बाहेरगावच्या प्रवाशांची कारवाईच्या नावाखाली लूट होत होती. त्यासंबंधीच्या तक्रारी तत्कालीन आयुक्तांकडे गेल्यानंतर आयुक्तांनी गर्दीच्या ठराविक भागातच कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. अमुल्या क्लिन अप या संस्थेमार्फत कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात होते; परंतु प्रत्यक्षात सार्वजनिक ठिकाणच्या अस्वच्छतेत काहीच फरक पडलेला दिसून येत नव्हता. आता संबंधित ठेकेदाराच्या दंडात्मक कारवाईतून नाशिककरांची सुटका झाली असली तरी अस्वच्छता करणाऱ्यांना चाप बसावा यासाठी महापालिकेनेच त्यासंबंधी नव्याने नियमावली तयार करण्यास सुरुवात केली आहे. नवनियुक्त आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्यासंबंधी आरोग्य विभागाला सूचनाही केल्या आहेत. नव्या नियमावलीत दंडाची रक्कम वाढविली जाणार असून, नियमावलीतही कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)