नाशिक : दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवर वाढत असलेले अत्याचार हा चिंतेचा विषय झाला आहे़ महिलांवर अत्याचार करणाºयांना कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद आहे़ महिलांनी अत्याचार सहन न करता तत्काळ पोलिसांची मदत घ्यावी तर शाळा वा महाविद्यालयातील तरुणींनी विशाखा समितीकडे तक्रार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अॅड़ अंजली पाटील यांनी केले़ पोलीस आयुक्तालयातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेअंतर्गत सातपूरच्या मौले सभागृहात पाटील बोलत होत्या़ डॉ. आशालता देवळीकर यांनी ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावर बोलताना महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, असे सांगितले़ आहाराचे पथ्य, कामाच्या सवयी व व्यायाम केल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होत असल्याचे देवळीकर यांनी सांगितले़ आमदार हिरे यांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक करून यामुळे जागरूकता निर्माण होईल, असे सांगितले़यावेळी आमदार सीमा हिरे, पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, उपायुक्त माधुरी कांगणे, सहायक आयुक्त सचिन गोरे, महिला सुरक्षा विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक भावना महाजन आदी उपस्थित होते.
महिलांवर अत्याचार करणाºयांना कठोर शिक्षा : अंजली पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:44 AM