नाशिक : रजा मंजूर असतानाही गैरहजर असल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सेवेतून निलंबित केल्याच्या निषेधार्थ ग्रामीण रोजगार हमी कायदा कर्मचारी संघटनेच्या कंत्राटी कामगारांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर कर्मचाºयांनी केलेल्या आंदोलनामुळे रोहयोचे कामकाज ठप्प झाले आहे.पदाधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन निलंबित कर्मचाºयांना कामावर घेण्यात यावे, अशी मागणी केली परंतु त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. या गोष्टींच्या निषेधार्थ तसेच कर्मचाºयांना मानधन तत्काळ देण्यात यावे, ८ टक्के फरकाची रक्कम तत्काळ कर्मचाºयांना देण्यात यावी, कंत्राटी कर्मचाºयांना देण्यात येणारी अपमानास्पद वागणूक बंद करावी, अशा मागण्यांसाठी जिल्ह्णातील ९० कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन छेडले आहे. निलंबनाचे आदेशजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी दोन आठवड्यांपूर्वी मालेगाव पंचायत समितीला भेट दिली असता त्यावेळी रोहयोचे तीन कंत्राटी कामगार अनुपस्थित आढळून आल्याने गिते यांनी त्या कर्मचाºयांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश काढले. विशेष म्हणजे सदर कर्मचाºयांनी रजेसाठी अर्ज करून त्याला मंजुरीही घेतली होती व त्याची कल्पना उपजिल्हाधिकाºयांना दिली होती. तरीही त्यांना निलंबित करण्यात आल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
रोहयो कामगारांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 11:49 PM
नाशिक : रजा मंजूर असतानाही गैरहजर असल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सेवेतून निलंबित केल्याच्या निषेधार्थ ग्रामीण रोजगार हमी कायदा कर्मचारी संघटनेच्या कंत्राटी कामगारांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर कर्मचाºयांनी केलेल्या आंदोलनामुळे रोहयोचे कामकाज ठप्प झाले आहे.
ठळक मुद्देकंत्राटी कर्मचाºयांना देण्यात येणारी अपमानास्पद वागणूक बंद करावी,