नाशिक : आरक्षणाच्या मर्यादेपलीकडे जाऊन आरक्षण दिल्यामुळे राज्यातील ५० टक्के आरक्षण ७४ टक्के झाले असल्याने ५० टक्केपेक्षा जास्त आरक्षण असता कामा नये, आरक्षणाचे पुनर्विलोकन करण्याच्या मागणीसाठी सेव्ह नेशन, सेव्ह मेरिट या संघटनेच्या वतीने शहरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. सर्वसाधारण गटातील अनेक संस्था, संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला.आरक्षणाची मूळ मर्यादा आणि आरक्षणाची आवश्यकता याबाबतचे निकष बाजूला सारून आरक्षण देण्यात आल्यामुळे समाज व्यवस्था विस्कळीत झाली असून, यामुळे आरक्षणाचा मूळ हेतू बाजूला सारला गेला आहे. वास्तविक सद्यपरिस्थिती आणि आरक्षणाची आवश्यकता यावरच मुळात चर्चा होणे अपेक्षित असल्याचे सेव्ह नेशन, सेव्ह मेरिट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. केवळ ५० टक्के आरक्षणाची मर्यादा असताना ती वेळोवेळी वाढवत नेली आणि आता थेट ७० टक्केच्या पुढे गेले आहे.याप्रसंगी उमेश मुंदडा, दीपक मुठे, डॉ. लिना पिचा, मंजिरी मदमुरकर, डॉ. मनोज चोपडा, राहुल लोया, लीलाधर राठी, अल्पना लोढा, गुणवंत मणियार आदींसहडॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थ्यांचा सहभाग : १३ रोजी बाइक रॅलीआरक्षणास विरोध दर्शविण्यासाठी रविवार कारंजा चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. नेमीचंद पोद्दार आणि सराफ यांच्या हस्ते आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी येत्या १३ रोजी शहरातून बाइक रॅली काढण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
आरक्षणविरोधात घंटानाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:22 AM