शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

देवमामलेदारांच्या यात्रोत्सवात सटाण्यात रंगली कुस्त्यांची दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 5:36 PM

सटाणा : येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित यात्रोत्सवानिमित्त शनिवारी (दि.२८) आरम नदीपात्रात भरविण्यात आलेली विराट कुस्ती दंगली राज्य व परराज्यातून आलेल्या नामांकित कुस्तीगीरांमुळे कुस्ती शौकिनांच्या डोळयांचे पारणे फेडणारी ठरली.

ठळक मुद्देपरराज्यातून कुस्तीपटू दाखल झाले होते.

सटाणा : येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित यात्रोत्सवानिमित्त शनिवारी (दि.२८) आरम नदीपात्रात भरविण्यात आलेली विराट कुस्ती दंगली राज्य व परराज्यातून आलेल्या नामांकित कुस्तीगीरांमुळे कुस्ती शौकिनांच्या डोळयांचे पारणे फेडणारी ठरली.यंदा राज्य व परराज्यातील महिला व युवती मल्लांनी स्वयंस्फूर्तीने कुस्ती दंगलीत सहभाग घेतल्याने ही दंगल चांगलीच रंगली. हे या दंगलीचे प्रमुख आकर्षण ठरले. बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्यातर्फे लावण्यात आलेल्या छोटू खांडेकर (साक्र ी) व सोनू दळवी (चाळीसगाव) यांच्यातील चांदीचे कडे आणि पाच हजार रूपयांच्या अत्यंत चुरशीचा व उत्कंठावर्धक झालेला अंतिम सामना सायंकाळी सात वाजेपर्यंत रंगला. अखेर सामना बरोबरीत सुटल्याने खांडेकर व दळवी या कुस्तीपटूंना पारितोषिक विभागून देण्यात आले.येथील देवमामलेदार मंदिराच्या मागील बाजूकडील आरम नदीपात्रात देवमामलेदारांच्या यात्रोत्सवानिमित्त आज शनिवारी कुस्ती दंगलींचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी दोन वाजता आमदार दिलीप बोरसे, उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत शिंदे, पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड,देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांच्या हस्ते बजरंगबलीच्या प्रतिमेचे पूजन करून व नारळ वाढवून कुस्ती दंगलीला प्रारंभ झाला.प्रमुख पाहुणे म्हणून देवस्थानचे उपाध्यक्ष रमेश सोनवणे, विश्वस्त रमेश देवरे, हेमंत सोनवणे, सुनील खैरनार, लालचंद सोनवणे, शरद शेवाळे, दीपक पाकळे, मुन्ना शेख, छोटू सोनवणे, बिंदु शर्मा, साहेबराव सोनवणे, जीवन सोनवणे आदी उपस्थित होते.कुस्ती दंगलीसाठी राज्य व परराज्यातील शंभरहून अधिक कुस्तीगिरांनी सहभाग नोंदविला. लहान वयोगटातील कुस्तीगीरांच्या कुस्तीपासून सुरु वात झाली. देवस्थानतर्फे नारळ व रोख रक्कम या विजयी कुस्तीपटूना देण्यात आली. शंभर रु पयांपासून ते अकरा हजार रु पयांपर्यंतच्या कुस्त्या लावण्यात आल्या.मानाच्या कुस्त्यांसाठी दोन हजार रु पये ते पाच हजार रु पयांची पारितोषिके ठेवण्यात आली होती. सटाणा पोलीस ठाणे व काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही रोखीच्या बिक्षसांच्या कुस्त्या लावल्या. या कुस्ती दंगलींमध्ये राज्यातील नाशिक, औरंगाबाद, येवला,मालेगाव, मनमाड, धुळे, नंदुरबार, चोपडा, पारोळा,नगर, जळगाव, नवापुर, पिंपळनेर आदींसह परराज्यातून कुस्तीपटू दाखल झाले होते.कुस्ती दंगली पाहण्यासाठी पंचक्र ोशीतील हजारो कुस्तीशौकीनांनी गर्दी केली होती. कुस्ती दंगलीच्या इतिहासात देवस्थानने आता दंगलीत युवतींचा सहभाग वाढविला आहे. या युवतींच्या कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती.पंच म्हणून यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष अनिल पाकळे, सचिन सोनवणे, शिवाजी पाकळे, दिलीप शिवरकर, नूरा शेख, शिवाजी जाधव आदींनी काम पाहिले. निलेश पाकळे, ललित सोनवणे, हवालदार नवनाथ पवार, पुंडलिक डंबाळे आदींसह कुस्ती शौकीन बहुसंख्येने उपस्थित होते. दीपक नंदाळे यांनी सूत्रसंचालन केले.@अवघ्या पाच वर्षांच्या हिरकणी खैरनार आणि सायली खैरनार या चिमुकलींचा रंगलेला कुस्तीचा सामना आजचे प्रमुख आकर्षण ठरला. यामध्ये हिरकणी खैरनार हिने विजय मिळविला. प्रज्ञा बिरवच्छे (इगतपुरी) हिने शुभेच्छा जाधव (लासलगाव), सर्वज्ञा पवार (मालेगाव) हिने अरु णा डंबाळे (पुणेगाव), प्रियांका मंडाले (चांदवड) हिने पूजा पवार (कंधाने) तर पल्लवी हेबांडे (पिंपळगाव) हिने साक्षी आहेर (देवळा) हिला चारीमुंड्या चित करीत विजय मिळविला. 

टॅग्स :Templeमंदिरsatara-acसातारा