नाशिक : ‘निराकार सोहे तुमरो सगुण रुप’, ‘जा रे कागा जा’, ‘निंदीया जगा ये’ यासारख्या सुरेल रचनांच्या सादरीकरणातून नव्या पिढीतील आश्वासक सूर ईश्वरी दसककर हिने ‘सूर विश्वास’ची शनिवारची सकाळ आनंददायी केली. स्वरांची उपजत जाण आणि नादमाधुर्य यांची अनोखी पेशकश करत ईश्वरीने सजविलेली ही मैफल संपूच नये, अशीच भावना उपस्थित रसिकांची झाली.सावरकरनगरातील क्लब हाऊस येथे ‘सूर विश्वास’चे चौथे पुष्प ईश्वरी दसककर हिने गुंफले. मैफलीची सुरु वात ‘आतम रु प’ या विलंबित बंदिशीने झाली. निराकार सोहे तुमरो सगुण रु प ह्या रचनेतून निराकार आणि सगुण-निगुर्णाच्या आवेग समोर आला. त्यानंतर ‘जा रे कागा जा’ हे शब्द घेऊन देसी राग सादर केला. चैती गान प्रकारातील ‘सोवत निंदीया जगा ये’ यामधून हळवी लेकर या रागाचे वेगळेपण सांगून गेली. ‘सजनवा सावन बितो जाये’ हे शब्द नव्या मैफीलीसाठी आस जागवणारे होते. सूरश्री दसककर (हार्मोनियम), सुजित काळे (तबला) हयानी साथसंगत केली कार्यक्र माचे सुत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे यानी केले. विनायक रानडे यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन विश्वास ग्रृप’चे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर यांनी केले होते. यावेळी शहरातील गानरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ईश्वरी सूरांच्या मैफलीत रसिक दंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 4:38 PM
सूर विश्वास : नाशिककरांची आनंददायी सकाळ
ठळक मुद्दे ‘सजनवा सावन बितो जाये’ हे शब्द नव्या मैफीलीसाठी आस जागवणारे होते