काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या निर्बंधांतून सूट देण्यात आलेली असल्यामुळे, तसेच सण, सोहळे असल्याकारणाने नागरिकांची गर्दी वाढत आहे. याबरोबरच कोरोना रुग्णांची संख्यादेखील वाढत असल्याने सर्वांना दक्षतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. विशेषत: ज्या जिल्ह्यांच्या शेजारील जिल्ह्यात रुग्णवाढ होत आहे त्या शेजारील जिल्ह्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
नाशिकला लागून असलेल्या नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ होत असल्यामुळे नाशिक जिल्ह्यात काळजी घेणे अपेक्षित असल्याचे कुंटे यांनी सांगितले. विशेषत: सिन्नर तालुक्यातील नागरिकांचा संपर्क अधिक येत असल्याने सिन्नरमध्येही संख्या वाढत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत याबाबत गंभीर विचार करण्यात आला.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहिती दिली. बैठकीस मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात आदींची उपस्थिती होती.