शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

गॅसच्या वाढत्या किमतीमुळे महिलांच्या डोक्यावर पुन्हा आली सरपणाची मोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2022 8:50 PM

सायखेडा : हजारी पार केलेल्या गॅसने आपली जागा बदलली असून गॅस अडगळीच्या खोलीत गेला तर गॅसची जागा पुन्हा एकदा चुलीने घेतली आहे त्यासाठी लागणाऱ्या सरपणाची मोळी पुन्हा एकदा महिलांच्या डोक्यावर दिसू लागल्याने आपण २० वर्ष मागे गेल्याची अनुभूती येऊ लागली आहे.

ठळक मुद्देमोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातून गॅसवरील स्वयंपाक हद्दपार होत आहे.

सायखेडा : हजारी पार केलेल्या गॅसने आपली जागा बदलली असून गॅस अडगळीच्या खोलीत गेला तर गॅसची जागा पुन्हा एकदा चुलीने घेतली आहे त्यासाठी लागणाऱ्या सरपणाची मोळी पुन्हा एकदा महिलांच्या डोक्यावर दिसू लागल्याने आपण २० वर्ष मागे गेल्याची अनुभूती येऊ लागली आहे.ग्रामीण भागात दररोज मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातून गॅसवरील स्वयंपाक हद्दपार होत आहे.रेशन धान्य दुकानातून २०१४ पासून केरोसिन मिळणे बंद झाल्यानंतर देशातील अनुसूचित जातीसह अन्य विविध घटकांमधील सर्वसामान्य महिलांसाठी ह्यउज्ज्वलाह्ण योजना आली. त्याअंतर्गत सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणावर लाभार्थी आहेत. दरमहा त्यांना एक गॅस सिलिंडर मिळते. सुरुवातीला दीडशे ते तीनशे रुपयांपर्यंत मिळणारी सबसिडी आता एक ते पाच रुपयांवर आली. गॅस सिलिंडरचे दर वाढल्यानंतरही सबसिडी वाढलेली नाही. त्यामुळे जवळपास सव्वासात लाख ह्यउज्ज्वलाह्ण पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत आहेत.हातावरील पोट असलेल्या महिलांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या चिंतेतून दररोज रोजगार शोधावा लागतो. चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांमध्ये डोळ्याचे विकार वाढले. त्यामुळे केंद्र सरकारने त्या महिलांना वर्षात१२ गॅस सिलिंडर सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला सबसिडी अधिक मिळत असल्याने कनेक्शनची संख्या भरमसाट वाढली. मात्र, सबसिडी टप्प्याटप्याने कमी करण्यात आली. तीनशे रुपयांपर्यंत मिळणारी सबसिडी मागील काही वर्षांत अवघ्या पाच रुपयांपर्यंत खाली आली. त्यामुळे पुन्हा सरपणाची ह्यचूलह्णच बरी असा सूर त्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलांमधून निघू लागला. सध्या गॅस सिलिंडरचा दर १००० रुपयेपर्यंत झाला आहे. हातावरील पोट असलेल्यांना तेवढी रक्कम देऊन सिलिंडर खरेदी करणे परवडत नाही. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत. दुसरीकडे डिझेल, पेट्रोल दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.दिवसाला दोनशे रुपये रोज मिळतो, त्यात उन्हाळा कडक असल्यामुळे हाताला काम मिळत नाही, त्यामुळे पैसे येणे बंद झाले आहे. अशा परिस्थितीत १ हजार ३० रुपये खर्च करणे सामान्य कुटुंबाला परवडत नसल्याने शेताच्या कडेला असणाऱ्या झाडांच्या फांद्या गोळा करून चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.- सुनीता कमानकर, गृहिणी, भेंडाळी.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासGovernmentसरकार