जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील रेंडाळे, न्याहारखेडे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील बंधाऱ्यातील गाळ उपसा केल्याने, मोठ्या प्रमाणात पाणी साठवून झाल्याने आसपासच्या शेतीला फायदा होणार आहे.
रेंडाळे पाझर तलावातील ८३,६३९,४७ घनमीटर गाळ उपसा झाल्याने ८,३६,३९,४७० लिटर पाणी साठल्याने या बंधाऱ्याखालील ७८० हेक्टर क्षेत्राला लाभ होऊन ३६० शेतकऱ्यांच्या २६० विहिरींना फायदा होणार असून, बंधाऱ्यातील गाळ उपसा टाकून ६३ एकर जमीन सुपीक झाली आहे.
रेंडाळे येथील बंधारा भरल्याने गॅलक्सी सर्फिक्ट्ंस. लि. मुंबई उपाध्यक्ष आदर्श नय्यर, युवा मित्र कार्यकारी संचालिका मनीषा पोटे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी युवा मित्र सहसंचालिका शीतल डांगे, जलसमृद्धी प्रोजेक्ट मॅनेजर अजय महात्मे, धनंजय देशमुख, स्वप्नील कमोदकर, कमलेश काळे, समाधान कासार, सरपंच कमलताई मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्रावण देवरे, कानिफनाथ मढवई, विठ्ठल वाळके, संजय चिखले, मंदाकिनी देवरे, नवनाथ आहेर, प्रंभाकर गरुड, एकनाथ मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
येवला तालुक्यात सन २०२०-२१ या वर्षात तेरा गावे व २२ साइट्सवर ३.५ लाख घनमीटर बंधाऱ्यातील गाळ उपसा करण्यात आल्याने व साठवणूक झालेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा शेतीला होणार आहे.
(२६ जळगाव नेऊर २)
रेंडाळे येथील बंधारा भरल्याने जलपूजनप्रसंगी आदर्श नय्यर, मनीषा पोटे, कमल मोरे, श्रावण पाटील, देवरे आदी.
260921\26nsk_27_26092021_13.jpg
रेंडाळे येथील बंधारा भरल्याने जलपूजन प्रसंगी आदर्श नय्यर, मनीषा पोटे रेंडाळे कमलताई मोरे, श्रावण पाटील देवरे आदी.