येवला : येथील ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.राज्य सरकार, केंद्र सरकार आरोग्यसेवेवर कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र कर्मचाऱ्यांअभावी आरोग्यसेवेचा लाभ गरजवंतांना मिळत नसेल, वेळेवर रु ग्णांना आरोग्य सुविधा मिळत नसतील तर या सुविधेचा उपयोग काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. येवला शहरातील ग्रामीण $$्निरुग्णालयात बुधवारी ६०० बाह्यरु ग्ण विभागात बसून होते. ग्रामीण ्नरुग्णालयात कार्यरत असलेले नगरपालिका प्रशासनाचे काही कर्मचाऱ्याची नगरपालिका कार्यालयात बदली झाल्याने आरोग्यसेवेची मुख्य जबाबदारी सांभाळणारे हे तीन कर्मचारी आता पालिकेत कारकुनाचे काम करणार आहेत. या रुग्णालयात डॉक्टरसह १० कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असून, मोठ्या प्रमाणावर बाह्यरुग्ण येत असताना उपजिल्हा रुग्णालयापेक्षाही अधिकचे काम येथे रोजच आहे. परंतु ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्राएवढादेखील स्टाफ या रुग्णालयात नसल्याने रुग्णाची हेळसांड होत आहे. मोठे घर आणि पोकळ वासा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. आॅगस्ट महिन्यात ११ हजार बाह्यरुग्णांनी येथे उपचार घेतल्याची नोंद दवाखान्याच्या दप्तरी आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकानी किमान पुरेसे कर्मचारी येवला ग्रामीण रुग्णालयाला द्यावे, अशी सातत्याने मागणी होत आहे. तरीही कर्मचारी वर्ग मिळत नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. केवळ उपलब्ध असलेल्या एका डॉक्टरला एवढ्या मोठ्या रुग्णांचा आवाका क्षमतेपलीकडे जात आहे. तरी शासनाने याची त्वरित दखल घेत कर्मचारी भरती करावी. (वार्ताहर)
ग्रामीण रुग्णालयात रु ग्णांची हेळसांड
By admin | Published: August 31, 2016 10:11 PM