नाशिक : महापालिकेने हरित नाशिक संकल्पना साकारण्यासाठी व शहरातील रिंगरोडवरील वृक्षतोडीचा मोबदला म्हणून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये दहा फूट उंचीच्या २१ हजार रोपांच्या लागवडीच्या उद्दिष्टपूर्तीकरिता श्रीश्री रविशंकर दिव्य मार्गाच्या दुतर्फा कदंब, टॅबोबिया या प्रजातीच्या रोपट्यांची लागवड केली गेली. या मार्गावरील बहुसंख्य झाडांची चांगली दमदार वाढ झाली आहे; मात्र संरक्षणाअभावी वाढलेल्या झाडांना धोका उद्भवला असून, काही झाडांची हानी होत असल्याचे चित्र नजरेस पडत आहे.सुमारे २१ हजार रोपांच्या लागवडीचे जणू अभियान मनपाकडून वर्षभरापूर्वी राबविले गेले. मनपाने नियुक्त केलेल्या ठेकेदारांनी जेसीबीद्वारे खड्डे घेऊन दहा फुटांची रोपे लावली. रविशंकर दिव्य मार्गालगतही अशाप्रकारे रोपे लावली गेली. पावसाळ्यामुळे येथील काही रोपांनी तगही धरल्याने रोपे सध्या हिरवीगार दिसत आहे; मात्र काही रोपांनी मान टाकली आहे, तर काही रोपे जनावरांनी कुरतडल्याने नाहीशी झाली आहे. पाच वर्षे लावलेल्या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारीही पालिक ा प्रशासनाने त्यावेळी संबंधितांवर निश्चित केली होती; मात्र याचा विसर पडल्याने संताप व्यक्त होत आहे. लावलेल्या रोपांची सुरक्षितता वाºयावर सोडल्यामुळे रोपे लावून केवळ उद्दिष्टपूर्ती केली गेली; मात्र हेतूला हरताळ फासल्याचे बोलले जात आहे. केवळ दहा फूुटाच्या रोपांचे दिलेले ‘टार्गेट’ पूर्ण झाल्यानंतर संबंधितांनी हात वर केल्यामुळे रोपांचे वृक्ष होणार का? असा प्रश्न सकाळ-संध्याकाळ या रस्त्यावरून फेरफटका मारणाºया नागरिकांनी उपस्थित केला आहे. ज्या रोपट्यांची हानी झाली त्याऐवजी पुन्हा नवीन रोपे अद्याप लावली गेली नाही. अधिकाºयांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे.वर्षभरापूर्वी लागवड; सुरुवातीपासूनच निष्काळजी गेल्या वर्षी वृक्षारोपणासाठी १५ जानेवारी ही डेडलाइन दिली होती. पाच ते सहा खासगी एजन्सींद्वारे यावेळी ‘खड्डे खोदा, रोपे लावा’ अशी मोहीम जिथे जागा मिळेल तिथे राबविण्यात आली. त्यावेळी दोन ते तीन दिवसांमध्येच काही ठिकाणी लावलेल्या रोपांच्या काड्या झाल्या, तर काही ठिकाणी नर्सरीमधील प्लॅस्टिक पिशव्यांसह रोपे खड्ड्यात उभी केल्याचेही वास्तव पुढे आले होते. त्यामुळे महापालिकेकडून करण्यात आलेला कोट्यवधींचा खर्चाचे ‘फळ’ नाशिककरांना पहावयास मिळेल का? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. सर्वच रिंगरोडलगत लावलेल्या झाडांपैकी बहुतांश झाडे अखेरच्या घटका मोजत आहे. उन्हाळ्यात खºया अर्थाने ही झाडे जगविण्याचे आव्हान राहणार आहे.
श्रीश्री रविशंकर मार्गावरील झाडांना संरक्षणाअभावी वाढलेल्या धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:23 PM