घोटी : इगतपुरी तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून, नद्या, नाले, तलाव तुडुंब भरले आहेत. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे. ग्रामीण भागातील मातीच्या घरांसह अनेक घरांना पावसामुळे गळती लागली आहे.भाम आणि भावली ही धरणे पूर्ण भरल्यानंतर उर्वरित धरणे भरण्याच्या स्थितीत आहेत. वाकी खापरी धरणात ८० टक्के पाणीसाठा झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दरवर्षी महत्तम वेगाने पाणी सोडले जाते. आज या धरणातून दारणा धरणात वेगाने पाणी सोडण्यात आले. यामुळे प्रशासनाने धरणाच्या लाभक्षेत्रातील जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. आतापर्यंत इगतपुरी तालुक्यात ८०.४२ टक्के पाऊस झाला असून, संततधार सुरूच राहिल्यास दोन दिवसात वार्षिक पाऊस पूर्णत्व घेणार असल्याची शक्यता आहे. आतापर्यंत २६७४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.कोसळणाऱ्या पावसामुळे घोटी, इगतपुरी आदींसह प्रमुख गावांतील जनजीवन कोलमडले आहे. पावसामुळे भावली आणि भाम धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. वाकी खापरी धरणाच्या निर्मितीचे हे दुसरे वर्ष असून, दरवर्षी धरणात ८० टक्के पाणी साठल्यानंतर त्यावरील पाणी खबरदारी म्हणून सोडण्यात येते. हे पाणी दारणा धरणाच्या प्रवाहाला जाऊन पुढे मराठवाड्याकडे वळण घेते. महत्तम वेगाने पाणी सोडल्यामुळे धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गुरुवारपासून या धरणातून पाणी सोडले जात आहे.पावसामुळे अनेक भागातील गटारी, कारखाने आदींचे पाणी मुख्य प्रवाहात समाविष्ट झाले आहे. यामुळे पाणीपुरवठा करणाºया विहिरी, विंधनविहिरी, नद्या यामध्ये अशुद्ध आणि दूषित पाणी आहे. शेतीच्या कामांचा वेग मंदावलाशेतीच्या कामांना आलेला वेग सततच्या पावसामुळे मंदावला आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक पावसामुळे जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून इगतपुरी तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर धरणे असून, राज्यातील अनेक भागांचे जीवनमान येथे पडणाºया पावसावर आधारित असते. त्यानुसार इगतपुरीत पडणाºया पावसावर अनेकांच्या नजरा खिळलेल्या असतात. यावर्षी उशिरा सुरू झालेला पाऊस विक्र म मोडीत काढणारा ठरला. तालुक्याच्या सर्वच भागात कोसळधारा सुरूच आहे. प्रमुख पीक भाताच्या लागवडकाळात पाऊस चांगला होत असल्याने यंदा भाताचे विक्र मी उत्पादन होणार असल्याचे संकेत आहेत.रस्त्यांची झाली दैनाविविध गावांतील रस्त्यांची अवस्था पावसामुळे भीषण अवस्थेकडे आहे. रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये तलाव निर्माण झाले आहे. इगतपुरी, घोटी, वैतरणा, वाडीवºहे, टाकेद बुद्रुक, साकूर फाटा, धामणगाव, पिंपळगाव मोर आदी भागातील रस्त्यांना दैन्यावस्था प्राप्त झाली आहे. इगतपुरी शहरातल्या रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांचा रोष वाढतो आहे.