शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

दिंडोरी तालुक्यातील नद्या डिसेंबरमध्येच कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 6:18 PM

लखमापूर : दिंडोरी तालुक्याला धरणांचा तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते; परंतु धरणाच्या तालुक्यातील नद्या यंदा डिसेंबरपासूनच कोरड्या झाल्या असल्याने भविष्यात पाण्याचे नियोजन काय, असा सवाल जनतेसमोर उभा राहिला आहे. दिंडोरी तालुक्यात करजंवण, वाघाड, पालखेड बंधारा, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव आदी मोठी धरणे असून काही छोटी धरणेही या तालुक्यात आहेत.

ठळक मुद्देभविष्यात पाणी टंचाईची शक्यता : नागरिकांमध्ये भीती व्यक्त

लखमापूर : दिंडोरी तालुक्याला धरणांचा तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते; परंतु धरणाच्या तालुक्यातील नद्या यंदा डिसेंबरपासूनच कोरड्या झाल्या असल्याने भविष्यात पाण्याचे नियोजन काय, असा सवाल जनतेसमोर उभा राहिला आहे.दिंडोरी तालुक्यात करजंवण, वाघाड, पालखेड बंधारा, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव आदी मोठी धरणे असून काही छोटी धरणेही या तालुक्यात आहेत.दिंडोरी तालुक्यातील या धरणांतून निफाड, येवला, मनमाड तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी रोटेशन पध्दतीने पाणी पुरवठा केला जातो; परंतु मागील वर्षी या काळात खळखळून वाहणाऱ्या नद्यांनी मात्र यंदा डिसेंबरमध्येच तळ गाठल्याने भविष्यात चिंतेचा विषय ठरू पाहत आहे.विशेष म्हणजे आतापर्यंत कधीही डिसेंबर महिन्यात कादवेचे पात्र कोरडे पडले नव्हते. यंदा प्रथमच कादवा नदी कोरडी झाली आहे. त्यामुळे तर्कविर्तक काढले जात आहे.तालुक्यातील करजंवण धरण क्षेत्रात मागील वर्षी १,२४४ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे साधारणपणे ऑगस्ट महिन्यापर्यंत करजंवण धरण १०० टक्के भरलेले होते. त्याच्या उलट यंदाची स्थिती आहे. यावर्षी करजंवण धरण कार्यक्षेत्रात ८९० मिलिमीटर पाऊस झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत धरण क्षेत्रात ३५४ मिलीमीटर पाऊस कमी पडला आहे. करजंवण धरण सध्याच्या स्थितीत ९३ टक्के भरलेले आहे.मागील वर्षी दिंडोरी तालुक्यात साधारणपणे १,६८६.९० मिलिमीटर पाऊस झाला होता. तर चालू वर्षी ९९१.४५ इतका पाऊस झाला आहे. काही जुन्या जाणकार अभ्यासकांच्या मतानुसार यंदा चार वर्षाच्या तुलनेत दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात कमी पाऊस पडल्याची नोंद आहे. 

टॅग्स :water shortageपाणीकपातRural Developmentग्रामीण विकास