नाशिक :केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (युपीएससी) घेण्यात आलेल्या नागरी सेवा २०१८च्या परीक्षेचा निकाल शुक्र वारी (दि.५) जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकच्या तीघे विद्यार्थी चमकले आहेत. यामध्ये स्मित लोढा याने ८५वा, तर जेलरोडवरील पंचक गावातील रियाज अहमद सय्यद याने २६१वा क्रमांक पटकाविला तसेच नवजीवन पवार याने ३१६वा क्रमांक राखला. स्मित हा आयपीएस असल्याचे समजते तर रियाज हा वनविकास महामंडळाची परीक्षा उत्तीर्ण करून वनपरिक्षेत्र अधिकारीपदाचे प्रशिक्षण सध्या दार्जिलिंगमध्ये घेत आहे.युपीएससीच्या परीक्षेत पहिल्या ५० उमेदवारांमध्ये मध्ये राज्यातील पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परिक्षेसाठी एकूण ७५९ विद्यार्थी यशस्वी झाले असून, त्यापैकी १८० उमेदवारांनी आयएएस तर ३० उमेदवार आयएएस तर १५० उमेदवारांनी आयपीएस रॅँक मिळविली आहेत. अ गटातून ३८४, ब गटातून ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तीन टप्प्यातून जावे लागते. तसेच त्यांची खासगी मुलाखतही घेतली जाते. युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर झाले आहेत.समाजसेवेसाठी रियाजने पदवीपासूनच भारतीय प्रशासकीय सेवेत नोकरी करण्याचे स्वप्न बाळगले होते. त्यादृष्टीने त्याने तयारी केली होती. २०१४साली त्याने पदव्युत्तर पदवी मिळविल्यानंतर अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत केले. रियाजचा हा पाचवा प्रयत्न होता, त्याने परिक्षेचा अर्ज भरतानाचा प्रथम प्राधान्य म्हणून ‘आयएएस’ची निवड केली होती. अंतीम परीक्षा अखेर तो उत्तीर्ण झाला असून २६१वी रॅँक त्याला राखता आल्याने ‘आएएएस’ मिळेल, अशी आशा त्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.--स्पर्धा परिक्षा जिंकल्याचा आनंद आहे. अथक प्रयत्नानंतर मिळालेले यश हे जास्त आनंद देणारे ठरते, याचा प्रत्यय मला आला. स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण करण्याची जिद्द अन् कष्टाची तयारी ठेवल्यास यशाला गवसणी घालता येतेच. अपयशाने खचून न जाता अभ्यासामध्ये सातत्य टिकवून संयम बाळगणे गरजेचे आहे.- रियाज सय्यद, गुणवंत
#UPSC result : पंचक गावातील रियाजने ‘युपीएससी’त राखली २६१वी रॅँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 10:34 PM
स्मित हा आयपीएस असल्याचे समजते तर रियाज हा वनविकास महामंडळाची परीक्षा उत्तीर्ण करून वनपरिक्षेत्र अधिकारीपदाचे प्रशिक्षण सध्या दार्जिलिंगमध्ये घेत आहे.
ठळक मुद्देरियाजचा हा पाचवा प्रयत्न होता‘आएएएस’ मिळेल, अशी रियाजला आशा