लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अक्र ाळे ते जानोरी रस्ता सध्या खड्ड्यांनी व्यापला असून, वाहनधारकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यातच रस्त्याच्या कठड्याला भगदाड पडल्याने रात्रीच्या वेळी छोटे-मोठे अपघात होत असल्याने संबंंधित विभागाने तत्काळ रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.अक्र ाळे ते जानोरी हा रस्ता दिंडोरी तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या रस्त्याने अक्र ाळे, अंबे, जानोरी, दहावा मैल, मोहाडी, एचएएल ओझर मिग आदी महत्त्वाच्या गावाला जोडणारा हा रस्ता सध्या खड्डेमय झाला आहे. गायकवाड वस्तीच्या पुढे मुख्य रस्त्याच्या कडेला पाण्याच्या जास्त प्रवाहामुळे रस्ता खचला असून, तो खड्डा नेमका वळणाच्या ठिकाणी असल्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांसाठी जीव मुठीत घेऊन जाण्यासारखेच आहे. यामुळे संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
अक्र ाळे ते जानोरी रस्ता खड्ड्यांनी व्यापला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 6:55 PM
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अक्र ाळे ते जानोरी रस्ता सध्या खड्ड्यांनी व्यापला असून, वाहनधारकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यातच रस्त्याच्या कठड्याला भगदाड पडल्याने रात्रीच्या वेळी छोटे-मोठे अपघात होत असल्याने संबंंधित विभागाने तत्काळ रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.
ठळक मुद्देअक्र ाळे ते जानोरी हा रस्ता दिंडोरी तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.