शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

लोकवर्गणीतून औरंगाबाद रस्त्याची डागडुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 5:39 PM

बोलठाण : आर्ट आॅफ लिव्हिंगच्या मदतीने ग्रामस्थांचा पुढाकार

ठळक मुद्देनुतनीकरण किंवा डागडुजी करण्यात आली नसल्याने रस्ता प्रचंड खराब होउन मोठ-मोठे खड्डे पडले होते

नांदगाव : जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या बोलठाणसह तेरा गावांना जोडणाऱ्या औरंगाबाद रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन आर्ट आॅफ लिव्हिंगच्या सहकार्यातून बोलठाण ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांनी लोकवर्गणी काढून रस्त्याची डागडुजी केली.नांदगाव तालुक्यातील पूर्व भाग असलेल्या कुसूमतेल, ढेकु खुर्द व बुद्रुक, वसंतनगर एक व दोन,चंदनपुरी, लोढरे, ठाकरवाडी, जातेगांव, बोलठाण, गोंडेगाव,जवळकी, रोहिले या तेरा गावांतील नागरिकांना वैद्यकीय सुविधेसाठी तसेच व्यापारी आणि शेतक-यांना मालाची खरेदी-विक्र  करण्यासाठी औरंगाबाद शहर जवळ असुन ते सत्तर किलोमीटर अंतरावर आहे. औरंगाबाद कडे जाण्यासाठीचा मार्ग शेजारील कन्नड तालुक्यातुन पाच किलोमीटर आणि उर्वरीत मार्ग वैजापूर तालुक्यातुन जातो. मात्र या पाच किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय स्थिती बनलेली आहे. रस्त्याचे डांबरीकरण वीस वर्षापूर्वी करण्यात आले होते. पुन्हा नुतनीकरण किंवा डागडुजी करण्यात आली नसल्याने रस्ता प्रचंड खराब होउन मोठ-मोठे खड्डे पडले होते. नाशिक व औरंगाबाद या दोन्ही जिल्ह्याच्या सीमारेषेवर हा भाग असल्याने सदर रस्त्याकडे औरंगाबाद जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आर्ट आॅफ लिव्हिंग आणि बोलठाण येथील ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानेश्वर नवले, सदस्य मच्छिंद्र पठाडे व पोलिस पाटील सोमनाथ खरोटे यांचेसह व्यापारी नेमीचंद ताथेड, विजय सोनी, गुलाबचंद गुगळे, प्रितेश नहार, योगेश गुगळे, संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुभाष गंडे,नानासाहेब नवले, जितेंद्र पाटणी यांनी वर्गणी जमा करून रस्त्यावर मुरु म, दगड जेसीबीच्या सहाय्याने डागडुजी केली.गावक-यांचे श्रमदानग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून बव्हंशी रस्त्यांची साधी डागडुजीही केली जात नाही. त्यामुळे ह्या रस्त्यावरील वाहतूक जीवघेणी ठरत चालली आहे. परंतु, शासनाच्या भरवशावर अवलंबून न राहता गावक-यांनीच आर्ट आॅफ लिव्हिंगच्या मदतीने रस्ता डागडुजीचा मार्ग निवडला. या रस्ता दुरुस्तीसाठी गावक-यांनी स्वत: श्रमदान केले.

टॅग्स :Nashikनाशिकroad transportरस्ते वाहतूक