नाशिक : दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेरील रस्त्यावर सायंकाळच्या सुमाराला रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाला वाहतूक करणारी चारचाकी वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, या वाहनांकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत आहे.एरवी वाहनांची कागदपत्रे नाही तसेच वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केली तर वाहतूक शाखेकडून सर्वसामान्य वाहनधारकांना वेठीस धरले जाते, तर दुसरीकडे भररस्त्यात वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाºया वाहनधारकांकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. दिंडोरीरोड हा वर्दळीचा रस्ता असल्याने या रस्त्याने सातत्याने वाहनांची वर्दळ सुरू असते. सायंकाळच्या सुमाराला शेकडो पालेभाज्यांची वाहने बाजार समितीत येतात. बाजार समितीत पालेभाज्यांचा लिलाव झाल्यानंतर वाहने बाजार समितीबाहेरील रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जातात. वारंवार रस्त्यावर उभ्या राहणाºया वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते, तर रस्त्याने पायी जाणाºया पादचाºयांना रस्त्यावरून चालताना जीव मुठीत धरूनच चालावे लागते. वाहतूक शाखेने रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाºया वाहनांवर कारवाई करून बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावावी, अशी मागणी होत आहे.
नाशिक बाजार समितीबाहेरील वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 3:07 PM
नाशिक : दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेरील रस्त्यावर सायंकाळच्या सुमाराला रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाला वाहतूक करणारी चारचाकी वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, या वाहनांकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत आहे.एरवी वाहनांची कागदपत्रे ...
ठळक मुद्देवाहतूक शाखेचे दुर्लक्ष अपघाताची शक्यता