इंदिरानगर : वडाळागावातील राजवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील वाहतुकीचा रस्ता लोखंडी पाइप लावून काही युवकांनी बंद केला आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीस गैरसोय होत असल्याची तक्रार केली आहे. महापालिकेचा रस्ता बंद करण्याचा अधिकार कोणाला आहे? असा प्रश्न त्रस्त नागरिकांनी केला आहे.सावित्रीबाई फुलेनगर, सादिकनगर, मेहबूबनगर, अण्णा भाऊ साठेनगरसह परिसरात शेकडोंच्या संख्येने नागरिक राहतात त्यामध्ये हातावर काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना शहरात ये-जा करण्यासाठी राजवाड्यातील रस्त्याने ये-जा करावी लागते. परंतु गेल्या चार ते पाच दिवसांपासून तेथील काही युवकांनी सदर रस्त्यावर लोखंडी गर्डर रस्ता अनधिकृत बंद केला. त्यामुळे नागरिकांना लांबून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे होणाºया गैरसोयींमुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सदर रस्ता बंद केल्याची तक्र ार मनपाला आॅनलाइन करताच मनपाचे कर्मचारी येऊन हा रस्ता मोकळा करण्यात आला. मात्र त्यांची पाठ फिरताच पुन्हा लोखंडी गर्डर लावून रस्ता बंद करून परिस्थिती ‘जैसे थे’ केली. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.तक्रार करणाºयाची झाली अडचणमहापालिकेच्या अॅपवर एका व्यक्तीने रस्ता बंद झाल्याची तक्र ार केली होती. तक्रारीनंतर महापालिकेचे कर्मचारी रस्ता मोकळा करण्यासाठी आले असता संबंधित व्यक्तीचे नाव तेथील युवकांना सांगितले. काही युवकांनी संबंधित तक्र ारदाराच्या घरी जाऊन याबाबत विचारणा केली. तक्र ार केली असता महापालिकेचे कर्मचारीच आॅनलाइन तक्र ारदाराचे नाव गोपनीय ठेवत नसल्यामुळे भविष्यात आॅनलाइनवर कोण तक्र ार करणार? असा प्रश्न पडला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे.
वडाळागावातील मनपाचा रस्ता केला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:23 AM