ब्राह्मणगाव : येथे व परिसरात उन्हाची तीव्रता वाढल्याने दुपारपासून रस्ते ओस पडू लागले आहेत. उन्हाचे चटके जास्त तीव्र झाल्याने सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रस्ते ओस पडू लागले आहेत. ऊस रसवंती, लस्सी ,आईस्क्र ीम, लेमन सोडा दुकाने सुरू झाली असून, थंड पेयांना मागणी वाढली आहे. शेतातील उन्हाळ कांदा काढणी अंतिम टप्प्यात असून, कांद्याला अद्याप मनाजोगता भाव नसल्याने उन्हाळ कांदा साठवणूक करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.पाणीटंचाईमुळे शेतकरीवर्ग संकटात असून, मार्चपासून जुलै पर्यंतचा मोठा कालावधी पाण्याविना कसा पार पडेल, ही चिंता सर्वांना भेडसावत आहे. जनावरांना चारा व पाण्याची मोठी अडचण निर्माण होणार असून, दुष्काळ आता समोर दिसू लागल्याने त्याचा थेट परिणाम अन्य व्यवसायांवर होऊ लागला आहे.(20ब्राह्मणगाव रसवंती)
उन्हाची तीव्रता वाढल्याने रस्ते ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 4:20 PM
ब्राह्मणगाव : येथे व परिसरात उन्हाची तीव्रता वाढल्याने दुपारपासून रस्ते ओस पडू लागले आहेत. उन्हाचे चटके जास्त तीव्र झाल्याने सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रस्ते ओस पडू लागले आहेत. ऊस रसवंती, लस्सी ,आईस्क्र ीम, लेमन सोडा दुकाने सुरू झाली असून, थंड पेयांना मागणी वाढली आहे.
ठळक मुद्देविहिरीदेखील आटल्या असून, पाणी टंचाईने शेती व्यवसायावर मंदीचे सावट दिसू लागले आहे. गेल्या वर्षी पावसाने परिसरात पाठ फिरविल्याने शेती पिकांना पाणीटंचाई भासू लागली आहे.