येवला : तालुक्यातील गवंडगांव - पांजरवाडी हा रस्ता मागील २० वर्षापासून अतीक्र मणामुळे बंद होता. या रस्त्याचे अतिक्रमण काढण्यात आले . गवंडगांव - पांजरवाडी या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील शेतकऱ्यांनी अतीक्र मण करून रस्ता बंद पाडलेला होता. त्यामुळे या दोन गावांचा संपर्क तूटला होता. सदर रस्ता बंद झाल्यामुळे शेतकºयांना मालवाहतूक करने, विद्यार्थ्यांना शाळेत जाणे तसेच रु ग्णांना घेऊन जाणे आवघड झाले होते. यासाठी सभापती रूपचंद भागवत यांनी मागील १ वर्षापासून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद नाशिक तसेच येवला तहसीलदार यांच्याकडे सदर काम मार्गी लागण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली होती़ त्यानुसार तहसीलदार नरेश बहीरम यांच्यासह जिल्हा परिषद उप विभाग येवलाचे सहायक अभियंता पाटील व कर्मचारी, पोलिस निरीक्षक नरेंद्र खैरनार यांनी या भागात अतीक्र मण विरोधी मोहीम राबवीत एकाच दिवसात अतीक्र मण काढून वहीवाटीसाठी रस्ता खुला केला आहे. यावेळी तहसीलदार नरेश बहीरम, उपनिरिक्षक नरेंद्र खैरनार,तलाठी खैरे, सहा.अभियंता पाटील, दाभाडे, लहरे, काकड, ग्रामसेवक मोरे, भास्कर भागवत, निवृत्ती भागवत, एकनाथ भालेराव, विजय खैरनार, ज्ञानेश्वर भागवत, नानासाहेब भागवत, संदीप कंबळे, आण्णासाहेब भागवत आदी ग्रामस्थांसह शेतकरी उपस्थित होते.
गवंडगाव -पांजरवाडी रस्ता झाला खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:35 AM