नाशिक : अंजनेरी गडावर जाण्यासाठी मुळेगावपासून थेट गडाच्या माथ्यापर्यंत सुमारे १४ किलोमीटरचा पक्का रस्ता करण्याचा प्रस्ताव पश्चिम वनविभागाकडे पाठविण्यात आला आहे. हा रस्ता अंजनेरी संवर्धन राखीव वनक्षेत्रातून जात असल्याने वनविभागाच्या अखत्यारितीतील १७ ते २० हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होण्याची भीती व्यक्त पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमी संस्थांकडून व्यक्त केली जात आहे. अंजनेरी राखीव वनाच्या पूर्वेच्या चतु:सीमेनुसार मौजे मुळेगावापासून तर थेट गडाच्या माथ्यापर्यंत सुमारे १४ किमी लांबीचा रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने वनविभागाला पाठविला आहे. या रस्त्याचा फायदा केवळ गडावर वाहनांद्वारे जाण्यासाठी भाविकांना होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गडावर कुठलीही लोकवस्ती नसल्यामुळे याव्यतिरिक्त रस्त्याचा कुठलाही फायदा सर्वसामान्यांना होणार नसल्याचे पर्यावरणप्रेमी संघटनांचे म्हणणे आहे. राखीव वन संवर्धन घोषित असतानासुध्दा सार्वजनिक बांधकाम व जिल्हा प्रशासनाकडून रस्त्याच्या प्रस्ताव वनविभागाकडे पाठविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ५६९.३६० हेक्टर राखीव वनक्षेत्रn नाशिकचे निसर्गवैभव असलेल्या अंजनेरी राखीव वनक्षेत्र हे नैसिर्गक जैवविविधतेच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थळ आहे. येथील जैवविविधतेचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य सरकारने ३१ जानेवारी २०१७ साली अध्यादेश जारी करत नाशिक प्रादेशिक वनविभागाच्या पश्चिम भागातील नाशिक वन परिक्षेत्रातील अंजनेरी गडावरील एकूण ५६९.३६० हेक्टर (५ हजार ६९३ चौ.किमी) क्षेत्र ‘राखीव संवर्धन’ म्हणून घोषित केले. या राखीव वनाची जपवणूक होणे गरजेचे असून त्यासाठी लोकसहभागही महत्त्वाचा आहे.
अंजनेरीच्या राखीव वनात रस्त्याचा घाट
By अझहर शेख | Published: October 17, 2020 1:06 AM
अंजनेरी गडावर जाण्यासाठी मुळेगावपासून थेट गडाच्या माथ्यापर्यंत सुमारे १४ किलोमीटरचा पक्का रस्ता करण्याचा प्रस्ताव पश्चिम वनविभागाकडे पाठविण्यात आला आहे. हा रस्ता अंजनेरी संवर्धन राखीव वनक्षेत्रातून जात असल्याने वनविभागाच्या अखत्यारितीतील १७ ते २० हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होण्याची भीती व्यक्त पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमी संस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
ठळक मुद्देनैसर्गिक जैवविविधता धोक्यात : मुळेगावपासून गडाच्या माथ्यापर्यंत रस्त्याचा प्रस्ताव