नांदूरवैद्य : इगतपुरीच्या पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली, बेलगाव कुर्हे, गोंदे दुमाला आदी भागातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून इगतपुरी तालुक्यातील कुर्हेगाव येथील नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्यांवर नेहमीच वाहनधारकांची वर्दळ असल्याने हा रस्ता पुर्णत: खचला आहे. या रस्त्यावर पथदीप नसल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामपंचायतीच्या सदस्य स्वाती गव्हाणे, मनीषा धोंगडे, ताराबाई पवार तसेच सोपान शिंदे, शिवसेनेचे गणप्रमुख आंबादास धोंगडे आदींनी केली. नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा असलेल्या या रस्त्याची बेलगाव कुºहेपासून ते गोंदे दुमाला फाट्यापर्यत अतिशय चाळण झाली असून या रस्त्याने शाळेतील विद्यार्थी, तसेच दैनंदिन रोजगारासाठी शेकडो कामगार गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतीमध्ये जात असतात.तसेच काही कामगार हे राञपाळी करून घरी जात असतात.परंतू या खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी तसेच संपूर्ण रस्त्यावर पथिदप नसल्यामुळे या ठिकाणी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.परिणामी या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरु स्ती करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.या रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरु स्ती होत नसल्यामुळे येथील ग्रामस्थांना मणक्याचे आजार, पाठदुखी, असे विविध आजारांची लागन होत असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.भविष्यात या ठिकाणी अपघात झाल्यास यास प्रशासन जबाबदार राहील असे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर ग्रामस्थांनी केली आहे.
कु-हेगाव येथे रस्ता खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 3:46 PM