विद्यार्थ्यांना शिक्षणाव्यतिरिक्त इतर सामाजिक जीवन विकासाविषयक माहिती देणे ही काळाची गरज बनत चालली आहे. त्यासाठीच विद्यार्थ्यांच्या रस्ता सुरक्षिततेची गरज लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सायखेडा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने क रस्ता सुरक्षा सप्ताह जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी रस्ता वाहतूक सुरक्षा जनजागृतीबाबत विविध प्रकारच्या घोषणा दिल्या व सुरक्षिततेचे संदेश देणाऱ्या फलकांद्वारे माहिती दिली. विद्यार्थी, शिक्षक व पोलीस अधिकारी यांच्या मार्फत नाशिक-औरंगाबाद महामार्गावर विनाहेल्मेट व तिहेरी प्रवासी घेऊन प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना चॉकलेट देऊन गांधीगिरीद्वारे रस्ते सुरक्षाचे व हेल्मेटवापराचे महत्त्व पटवून देण्यात आले. कार्यक्रमास पोलीस कॉन्स्टेबल गीते व नवले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. आर.बी. पोटे, प्रा. पी.पी. आहेर, प्रा. बी.बी. कोल्हे उपस्थित होते.
चांदोरी येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 7:07 PM