त्र्यंबकेश्वर : वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघातांची संख्या आपोआप कमी होईल असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी केले.
ते येथील त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात वाहतुकीचे नियम संदर्भात आयोजित रस्ता सुरक्षा अभियान प्रसंगी कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे होते तर उपप्राचार्य प्रा. सुरेश देवरे प्रा. माधव खालकर डॉ. अजित नगरकर रासेयो कार्यक्रम संयोजक प्रा. आशुतोष खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्तविक प्रा. आशुतोष खाडे यांनी केले. शारीरिक शिक्षण संचालक प्रा.नरेंद्र निकम यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. प्राचार्यांच्या हस्ते संदीप रणदिवे व साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. सुलक्षणा कोळी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. ज्ञानेश्वर माळे यांनी केले.