सायखेडा : के. के. वाघ कला वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, भाऊसाहेब नगर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. या अभियानअंतर्गत पिंपळस रामाचे जनजागृती फेरी काढण्यात आली. महाविद्यालयातील रा. से. यो स्वयंसेवकांनी नाशिक-औरंगाबाद महामार्गावर प्रवास करताना हेल्मेट व सिट बेल्टचा वापर करावा तसेच वाहतुकीचे सर्व नियम पाळावे यासाठी जनजागृती केली व नियम पाळणाऱ्या प्रवाश्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.कार्यक्रमासाठी पवन जाधव, गायत्री शिरसाठ, दिपेशा डांगळे, काजल सानप, श्रुतिका वाघ, हेमंत गांगुर्डे, शुभम अष्टेकर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य किरण वाघ, डॉ. भावना पौळ, प्रा. निकिता मत्सागर, प्रा. मनोज गायकवाड, प्रा. रक्षंदा कोल्हे, प्रा. रविंद्र राऊत व प्रा. पंकज वाघचौरे उपस्थित होते.
वाघ महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 7:12 PM
सायखेडा : के. के. वाघ कला वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, भाऊसाहेब नगर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. या अभियानअंतर्गत पिंपळस रामाचे जनजागृती फेरी काढण्यात आली.
ठळक मुद्देवाहतुकीचे सर्व नियम पाळावे यासाठी जनजागृती