कार्यक्र माचा शुभारंभ प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे व मनमाड पोलिस स्टेशनचे पवार यांच्या उपस्थितीत झाला. बाजार समिती परिसरामध्ये नेहमी कांद्याच्या ट्रॅक्टरची वर्दळ असते. अशा ट्रॅक्टर व अन्य वाहनांना रा.से.यो. स्वयंसेवकांमार्फत रस्ता सुरक्षा संदर्भातले रेडियम लावण्यात आले. यावेळी विविध घोषणांनी रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी रा. से. यो. कार्यक्र म अधिकारी डॉ. पी. बी . परदेशी, प्रा . एन. ए. पाटील, प्रा. वर्षाराणी पेढेकर व योगेश सोन्नर आदिंसह प्राध्यापकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
मनमाड महाविद्यालयातर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 5:02 PM