शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

साकोरेजवळील रस्ता गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 1:13 AM

कळवण : शुक्रवारी रात्री कळवण तालुक्यातील कळवण, अभोणा, दळवट व जयदर परिसरात व चणकापूर, पुनंद प्रकल्प व लघुपाटबंधारे प्रकल्प लाभक्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. चणकापूर व पुनंद प्रकल्पातून नदीपात्रात पूरपाणी सोडण्यात आले आहे. सप्तशृंगगड परिसरातील पावसामुळे मार्कंडपिंप्री लघुपाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने बेहडी नदी व नाल्यांना पूर आल्याने आदिवासी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्दे जोरदार पाऊस : हजारो क्विंटल कांदा, शेतमाल शेतातच

कळवण : शुक्रवारी रात्री कळवण तालुक्यातील कळवण, अभोणा, दळवट व जयदर परिसरात व चणकापूर, पुनंद प्रकल्प व लघुपाटबंधारे प्रकल्प लाभक्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. चणकापूर व पुनंद प्रकल्पातून नदीपात्रात पूरपाणी सोडण्यात आले आहे. सप्तशृंगगड परिसरातील पावसामुळे मार्कंडपिंप्री लघुपाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने बेहडी नदी व नाल्यांना पूर आल्याने आदिवासी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.बेहडी नदीवरील साकोरे गावाजवळील सीमेंट बंधाºयाचा भरावासह शेतकºयांनी श्रमदानातून केलेला साकोरे येथील रस्ता वाहून गेल्याने साकोरे येथील ५० शेतकºयांचा गावाशी संपर्कतुटला आहे. रस्ता नसल्याने नदीपलीकडील शेतकºयांचा शेकडो क्विंटल कांदा व शेतमाल शेतात अडकून पडणार आहे.चणकापूरमधून २१७२ क्यूसेक व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून ४५० ते ५०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले असून, चणकापूर उजव्या कालव्याला १०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. गोबापूर, नांदुरी, बोरदैवत, धार्डेदिगर, मळगाव चिंचपाडा, भांडणे, खिराड, मार्कंडपिंप्री, धनोली,भेगू, जामलेवणी, ओतूर आदी लघुपाटबंधारे प्रकल्पांचा पाणीसाठा वाढला असून, पूरपाणी नदीपात्रात सोडण्यात आल्याने कळवण तालुक्यात गिरणा, पुनंद, बेहडी, तांबडी नदीला पूर आला आहे. गिरणा काठावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.साकोरे येथील बंधाºयाचा भराव वाहून गेल्याने या बंधाºयाच्या खाली साकोरे येथील ५० शेतकºयांनी श्रमदानातून तयार केलेला रस्ता वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतमाल घेऊन जाणे अवघड झाले आहे.साकोरे येथील महादेव मंदिराकडील रस्ता पुरामुळे वाहून गेल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. साकोरे गावाशी संपर्कसाधण्यासाठी व शेतात येणे व जाण्यासाठी नदीपलीकडील ५० शेतकºयांचा आता शिरसमणीमार्गे पायपीट करावी लागणार आहे.शेतमाल व कांदा बाहेर काढायला रस्ता नसल्याने नदीपलीकडील शेतकºयांचा प्रत्येकी १० ट्रॅक्टर कांदा शेतात अडकून पडणार असल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. शिवाय मिरची, टमाटे, घेवडा आदी पिकांसह जनावरे नदीपलीकडे अडकून पडणार आहे. साकोरे येथील गोरख देवरे, आशुतोष आहेर, संदीप आहेर, रमेश आहेर, अभिमन्यू आहेर, सुभाष आहेर, राजाराम देवरे, दौलत आहेर, पोपट आहेर, माणिक देवरे, रामचंद्र देवरे, पंडित देवरे, दादा देवरे, कैलास आहेर, अनिल पवार, राजाराम आहेर, सुरेश आहेर, श्रावण वाघ, रवींद्र पवार, जिभाऊ वाघ, बापू पवार, मंगळू माळी, मोहन पवार, जयराम पवार, शिवदास पवार, शांताराम पवार, पिंटू माळी, कडू आहेर यांच्यासह अनेक शेतकºयांचा कांदा शेतात अडकून पडला आहे.नुकसानभरपाई देण्याची मागणी कळवण तालुक्यातील दुर्गम, आदिवासी भागातील सुपलेदिगरच्या खळीचा पाड्यावर २९ जुलै रोजी विजेच्या धक्क्याने हरी भवान चौरे या आदिवासी शेतकºयाच्या ४ गाई, १ बैल ठार झाला असून, आदिवासी शेतकºयाला तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी तहसीलदार कैलास चावडे यांच्याकडे केली. तहसीलदार चावडे यांनी पंचनामा केला असल्याचे सांगून शासनस्तरावरून नुकसानभरपाई म्हणून मदत देणार असल्याचे सांगितले.कळवण शहर व तालुक्यातील आदिवासी, दुर्गम व अतिदुर्गम भागातील रस्ते पावसामुळे उखडून गेले असल्याने रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. डोंगर उतारावरील पाण्याबरोबर मातीदेखील रस्त्यावर वाहून येत असल्याने रस्ते चिखलमय झाले असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.- विजय शिरसाठ, उपसभापती पंचायत समिती कळवण