सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटन स्थळ समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर दोन दिवसांपासून वादळी वाºयासह पाऊस सुरू आहे. या पावसामुळे येथील रिंग रोड खचल्याने नागरिकांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत आहे. सप्तशृंगगडावर दोन वेळेस यात्रा भरत असते. एक नवरात्र उत्सव व दुसरा चैत्रोत्सव. यावेळी लाखो भाविक देवी दर्शनासाठी येतात. यामुळे आलेला प्रत्येक भाविक हा फिरण्यासाठी व आंघोळीसाठी बसस्थानकावरून ते दत्तमंदिरमार्गे शिवालय तलावावर जात असतात. दर्शन करून आलेले भाविकही याच मार्गाने बाहेर जातात. त्यामुळे गावात गर्दी होऊ नये म्हणून हा रिंग रोड गावाच्या बाहेरून साकारण्यात आला आहे. परंतु झालेल्या अतिवृष्टीमुळे संरक्षक भिंत, कठडा अर्धवट तुटून रस्ता खचला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पावसामुळे सप्तशृंगगडावरील रस्ता खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 10:19 PM