शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

सोनेरी ते पाथरे रस्ता मे महिन्यात खुला होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 4:16 AM

नागपूर ते मुंबई हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग व सिन्नर-शिर्डी चौपदरी रस्ता कामाचा आढावा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा ...

नागपूर ते मुंबई हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग व सिन्नर-शिर्डी चौपदरी रस्ता कामाचा आढावा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गोंदे येथे सोमवारी (दि. ८) दुपारी घेतला. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गावर प्रत्यक्ष जाऊन कामाची पाहणी केली. यावेळी भुजबळ यांनी कामाबाबत समाधान व्यक्त करीत समृद्धी महामार्गाचे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात पॅकेज १२ मध्ये असलेल्या दिलीप बिल्डकाॅन येथे झालेल्या आढावा बैठकीत भुजबळ बोलत होते. बैठकीस आमदार माणिकराव कोकाटे, माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव ए. बी. गायकवाड, अधीक्षक अभियंता आर.पी. निघोट, कार्यकारी अभियंता सतीश श्रावगे, कार्यकारी अभियंता डी. के. देसाई, अभियंता एन. के.बोरसे, पी.व्ही. सोयगावकर, एनएचएआयचे प्रकल्प संचालक बी. एस. साळुंके, भूसंपादन उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे, पल्लवी गायकवाड तहसीलदार राहुल कोताडे, कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक मनीष मिश्रा, जनसंपर्क अधिकारी सुनील तोमर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. कंपनीच्या वतीने प्रोजेक्टरद्वारे सविस्तर सादरीकरण पालकमंत्री भुजबळ यांच्या समोर करण्यात आले. यामध्ये पॅकेज १२ प्रकल्प, ४५ किलोमीटर रस्त्यात १२ किलोमीटर सर्व्हिस रोड आहेत. छोटे-मोठे पूल, आगामी नियोजन, वृक्ष लागवड, मनुष्यबळ निर्मिती, कामाची सद्यपरिस्थिती याबाबत सादरीकरण करण्यात आले. या रस्त्यासाठी जिल्ह्यातील १० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची जमीन संपादित केली असून जवळपास बाराशे कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या काळात कामे अधिक वेगाने होणार असून मे २०२१ पर्यंत रस्ता सुरू होणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी भुजबळांना सांगितले.

इन्फो...

रस्त्यांची डागडुजी कंपनीने करावी

सिन्नर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रस्त्यांंची कामे होत असले तरी गौण खनिज वाहताना तालुक्यातील रस्त्यांची वाट लागली आहे. त्यामुळे सदर रस्ता दुरुस्त करून देण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची असल्याचे आमदार कोकाटे यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. तसेच रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक भिंत असल्याने शेतकरी वर्गांची मोठी अडचण झाली असून याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याने याबाबत तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. नागपूर-मुंबई हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असला तरी खराब झालेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, रस्ते विकास यांनी एकत्रितपणे पाहणी करून रस्ते दुरुस्तीसाठी नियोजन करणे आवश्यक असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.

===Photopath===

080221\08nsk_32_08022021_13.jpg

===Caption===

गोंदे येथे नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाच्या प्रगती कामाचा आढावा घेतांना पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत आमदार माणिकराव कोकाटे, समीर भुजबळ, ए. बी. गायकवाड आदीसह अधिकारी वर्ग.